Hair Transplant : कोणत्याही व्यक्तीला त्याचे केस (Hair) सर्वात जास्त आवडतात. 'टक्कल' कोणालाच आवडत नाही. टक्कल पडलेले अनेक लोक केस प्रत्यारोपणाची (Hair Transplant) शस्त्रक्रिया करतात.  दरम्यान, क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) ते रवी शास्त्री (Ravi Shastri) यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी देखील हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. दरम्यान, या हेअर ट्रान्सप्लांटच्या माध्यनातून कोट्यवधी रुपये कमावले जात आहे. भारतात करोडो रुपयांचा व्यवसाय चालत आहे. 


हेअर ट्रान्सप्लांटसाठी अमेरिका आणि युरोपमधूनही लोक भारतात


टक्कल पडण्यापासून सुटका करण्याची लोकांची इच्छा असते. आज भारतात हेअर ट्रान्सप्लांट हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. येत्या काळात हेअर ट्रान्सप्लांटचा व्यवसाय हा 4 हजार 660 कोटी रुपयांचा बनू शकतो. केवळ भारतीयच नाही तर काही लोक आपले टक्कल दूर करण्यासाठी भारतात येत आहेत. टक्कल पडण्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक आता हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करत आहेत. भारतातील या व्यवसायाचा आकार 2032 पर्यंत 560 दशलक्ष डॉलर (सुमारे 4,660 कोटी रुपये) पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये भारतात केस प्रत्यारोपणाचा व्यवसाय हा 180 दशलक्ष डॉलर(सुमारे 1,500 कोटी रुपये) होता. म्हणजेच येत्या 8 वर्षांत ही बाजारपेठ तिपटीने वाढणार आहे.


सेलिब्रिटींमध्ये हेअर ट्रान्सप्लांट लोकप्रिय


पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सेलिब्रिटींमध्ये हेअर ट्रान्सप्लांट सर्वाधिक लोकप्रिय आहे. टक्कल पडण्यापासून मुक्त राहण्यासाठी ते केस प्रत्यारोपण करत आहेत. जसजशी त्याची लोकप्रियता वाढेल तसतसा त्याचा व्यवसायही वाढेल. वर्ल्ड फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक संचालक डॉ. प्रदीप सेठी सांगतात की, जागतिक स्तरावरही केस प्रत्यारोपणाची बाजारपेठ खूप मोठी आहे. ती वेगाने वाढत आहे. भारतातील हे क्षेत्र 2032 पर्यंत 560 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.


डॉ. प्रदीप सेठी म्हणतात की ज्या सेलिब्रिटींनी त्यांच्याकडून केस प्रत्यारोपण केले आहे त्यात मोहम्मद शमी, भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओथेरपिस्ट अँड्र्यू लीप्स, इंग्लंडचा क्रिकेटर निक कॉम्प्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर मॉर्न व्हॅन विक, रवी शास्त्री आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश आहे. भजनसम्राट अनूप जलोटा, अरुण गोविल, अमीर बशीर यांनीही त्यांच्याकडून केसांचे प्रत्यारोपण करून घेतले आहे.


भारतात केस प्रत्यारोपणाचा कमी खर्च


भारतात केस प्रत्यारोपणाचा खर्च कमी येतो. टक्कल पडल्यावर उपचार घेण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधून लोक भारतात येत आहेत. प्रदीप सेठी स्वत: सांगतात की, त्यांच्याकडे दरवर्षी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे अमेरिका किंवा युरोपमधून येतात. यशस्वी केस प्रत्यारोपणाच्या बाबतीत दिल्ली-एनसीआर, जयपूर आणि मुंबई अव्वल आहेत.


पुढच्या 10 वर्षांनी हेअर ट्रान्सप्लांट वाढणार 


कस्टम मार्केट इंडेक्स’ च्या संशोधनातून हे देखील दिसून आले आहे की 2023 ते 2032 दरम्यान हेअर ट्रान्सप्लांट मार्केट दरवर्षी सुमारे 12 टक्के दराने वाढेल. जगभरातील वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातील ही सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी देखील आहे. जगातील सर्वाधिक केस प्रत्यारोपणाच्या ऑपरेशन्स आता भारतात केल्या जातात. त्याने तुर्कीला मागे टाकले आहे. महिलांपेक्षा पुरुषांना केसगळतीची जास्त काळजी असते, असेही अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Hair Care Tips : तुमच्या केसांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा; घनदाट केसांसाठी फायदेशीर उपाय