India vs Afghanistan World Cup 2023: दिल्लीत झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (India) अफगाणिस्तानचा (Afghanistan) 8 विकेटने पराभव केला.  या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. तर विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद अर्धशतक झळकावले. या सामन्यातील एका घटनेनं मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सामन्यादरम्यान विराट आणि अफगाणिस्तानचा खेळाडू  नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांनी एकमेकांना मिठी मारली. आता अफगाणिस्तानमधील तरुणी वाजमा अयुबीने (Wazhma Ayoubi) कोहली आणि नवीनच्या चाहत्यांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.


दिल्लीत झालेल्या टीम इंडियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचदरम्यान  अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते "विराट-विराट" असा जयघोष करत होते. दरम्यान, नवीन उल हक विराट कोहलीकडे गेला. त्यानंतर विराट कोहलीने नवीन उल हकला मिठी मारली. नंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना प्रोत्साहन दिले. तसेच दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होते. आता अफगाणिस्तानमधील वाजमा अयुबीने विराट आणि नवीन उल हक यांच्याबद्दल एक खास ट्वीट  केलं आहे. तिच्या या  ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


वाजमा अयुबीचं ट्वीट



वाजमा अयुबीनं  'दिल्ली है दिलवालों की. किंग विराट कोहलीने त्याचे चाहते आणि नवीन उल हकचे चाहते यांच्यामधील सुरु असलेला फॅन वॉर थांबवण्यास सांगितले. नंतर दोघांनी हस्तांदोलन करून एकमेकांना मिठी मारली. जे मला विचारतात की किंग कोहली माझा आवडता भारतीय खेळाडू का आहे? त्यांच्यासाठी हे उत्तर."






भारतीय खेळाडू विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यात आयपीएलदरम्यान वादावादी झाली होती. 1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला. लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भरमैदानात भिडला होता.  त्यानंतर आता विराट आणि नवीन उल हक यांनी कालच्या मॅचमध्ये मिठी मारल्यानंतर या दोघांच्या फॅनमध्ये सुरु असलेला वॉर देखील संपला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


World Cup : विराट-नवीन उल हकचा वाद संपला, सामन्यादरम्यान गळाभेट, गौतम गंभीरची प्रतिक्रिया, फोटो व्हायरल