Maratha Kranti Morcha Protest Updates: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरात (Maharashtra News) मराठा समाज (Maratha Samaj) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल (Viral Massage on Social Media) होत आहे. त्या मेसेजमध्ये मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह (South Mumbai Marine Drive) परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदबोस्त तैनात केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजनं मुंबई पोलिसांची चिंता वाढवली आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा मेसेज सध्या सर्वत्र फिरत आहे. हा मेसेज खरा की, खोटा हा प्रश्न आहेच. पण तरिदेखील मुंबई पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू होणार असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत असेल, असा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये आहे.
मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या काय?
आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचा उल्लेख व्हायरल मेसेजमध्ये आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू होणार असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत जाणार असल्याचंही बोललं जात आहे. पण, यामुळे आंदोलनामुळे मराठा समाजात दोन मतं तर निर्माण झाली नाहीत ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमदरण उपोषण केलं होतं. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण आता मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन छेडलं असल्याचं बोललं जात आहे.