Bhavina Patel : बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारताने आणखी एक पदक निश्चित केले आहे. भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत (वर्ग 3-5) हे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या (Semifinal) सामन्यात तिने इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याने किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे.


भावीनाने इंग्लंडची खेळाडू सूचा 11-6,11-6,11-6 अशा तीन सेट्समध्ये मात देत एकतर्फी पराभव केला.या आधी भाविनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही एकतर्फी विजय नोंदवला होता. तिने फिजीच्या अकानिसी लाटूवर 11-1, 11-5, 11-1 असा दमदार विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली होती.


भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू


भाविना पटेल सर्वात आधी 2011 च्या थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून प्रकाशझोतात आली. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने त्यावेळी सुवर्णपदक पटकावले.  नंतर, 2013 मध्ये0 आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीतही रौप्य पदक जिंकले. ती इथेच थांबली नाही. यानंतर त्याने 2017 मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्यपदकाला गवसणी घातली. मागील वर्षी टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही तिने कमाल कामगिरी करत थेट रौप्यपदक मिळवलं. हे तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश होते. आता कॉमनवेल्थमध्ये ती रौप्य पदकाला सुवर्णपदकात बदलेल का याकडे भारतवासिय़ांचे लक्ष आहे.


हे देखील वाचा-