World U-20 Athletics : भारताची ज्युनियर अॅथलीट रूपल चौधरी (Rupal Chaudhary) हिने वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स (World U-20 Athletics) स्पर्धेत ऐतिहासिक कामिगीर केली आहे. तिने वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे. रुपलने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य आणि 4*400 मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
गुरुवारी (5 ऑगस्ट) रात्री झालेल्या 400 मीटर शर्यतीत रूपलने 51.85 सेकंदाचा वेळ घेत तिसरं स्थान पटकावलं. यावेळी ग्रेट ब्रिटेनच्या येमी मारीने (51.50) सुवर्पपदक जिंकलं. दरम्यान याआधी रुपलने मंगळवारी 4*400 मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. ती असणाऱ्या भारतीय टीमने 3.17.76 मिनिटं घेत एशियन ज्युनियर रेकॉर्डसह पदकही जिंकलं.
वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्समध्ये भारताकडे 9 पदकं
वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत महिला गटात 400 मीटर शर्यतीत मेडल जिंकणारी रूपल दूसरी भारतीय असून याआधी हिमा दासने 2018 साली सुवर्णपदकाची कमाई केली होती. ऑलम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने देखील वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत 9 पदकांवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेला वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप या नावाने देखील ओळखलं जातं.
मूळची मेरठची आहे रुपल
रूपलही उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील आहे. तेथील शाहपुरच्या जैनपुर गावांत तिचे वडिल शेती करतात. अवघ्या 17 वर्षांची असणारी रुपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली आहे. तिने ज्युनियर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ दाखवला आहे. यंदाच्या वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत रुपलने मिळवलेल्या यशानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा-