कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

भारताने या विजयासोबतच विश्वविक्रमाचीही नोंद केली. वन डे क्रिकेटच्या 46 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेला त्यांच्याच देशात जाऊन 5-0 ने मात देणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.

पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला वन डे 9 विकेट्सने, दुसरा 3 विकेट्सने, तिसरा 6 विकेट्सने, चौथा 168 धावांनी आणि पाचवा वन डे 6 विकेट्सने जिंकला.

भारताने श्रीलंकेवर तीन वर्षात सलग दुसऱ्यांदा 5-0 ने मात केली. यापूर्वीही भारताने मायदेशात नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेला 5-0 ने धूळ चारली होती.

दरम्यान भारताने परदेशात दुसऱ्यांदा 5-0 ने विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वातच टीम इंडियाने यापूर्वी झिम्बाम्ब्वेवर त्यांच्याच देशात 5-0 ने मात केली होती.

संबंधित बातम्या :

सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!


क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा


वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!