India in World Taekwondo Championship 2023 : अझरबैजान (Azerbaijan) येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ (Team India) सहभागी होणार असून याची घोषणा करण्यात आली आहे. बाकू 2023 जागतिक तायक्वांदो चॅम्पियनशिप बाकू क्रिस्टल हॉल येथे होणार आहे. अझरबैजानची राजधानी बाकू येथे 29 मे ते 4 जून 2023 या कालावधीत भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. 


जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार


बाकू येथील जागतिक तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघाचा पीस तायक्वांदो अकादमी, स्पोर्ट्सक्यूब सेंटर फॉर एक्सलन्स, गुरुग्राम येथे एका भव्य समारंभात भारत तायक्वांदो आयोजकांनी सत्कार केला आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारत तायक्वांदोने जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या खेळाडूंना अधिकृत किट देण्यात आलं. टीम इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी गुरुग्राम येथील अकादमीतील सुविधांचा सविस्तर दौरा केला आणि खेळाडूंसाठी विकसित केलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांचे कौतुक केलं. 


अझरबैजानच्या बाकू मध्ये रंगणार स्पर्धा


भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर म्हणाले, “टीम इंडिया बाकू येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे आणि मी संघाच्या संभाव्यतेबद्दल खूप आशावादी आहे. यामुळे भारतीयांना जागतिक स्तरावर त्यांची प्रतिभा दाखवण्याची आणखी एक बहुप्रतिक्षित संधी मिळेल. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चांगली संधी, व्यासपीठ आणि अनुभव मिळवण्यात मदत होईल."


राष्ट्रीय तायक्वांदो संघ 2023 चे मुख्य प्रशिक्षक हसन मलेकी म्हणाले की, “तपशीलवार अभ्यासानंतर, आम्ही बाकू येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात यशस्वी झालो. सर्व खेळाडूंसाठी आम्ही उत्सुक आहोत. भारताकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभा आहे. भारती एक प्रतिभावान संघ असून आम्ही या क्षणासाठी खूप कठोर प्रशिक्षण घेतले आहेत. मला खात्री आहे की आम्ही जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करू."


जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे.


महिला खेळाडू :


ट्विशा काकरिया (46 किलोखालील), दीक्षा शर्मा (49 किलोखालील), लतिका भंडारी (53 किलोंखालील), सोनम रावल (57 किलोंखालील), सानिया खान (62 किलोंखालील), मार्गारेट एम. रेगी (67 किलोंखालील), इतिषा दास (73 किलोपेक्षा कमी) आणि रोदाली बरुवा (73 किलोपेक्षा जास्त).


पुरुष खेळाडू :


अमन काद्यान (54 किलोखालील), नीरज चौधरी (58 किलोंखालील), अजय गिल (63 किलोंखालील), पृथ्वीराज चौहान (68 किलोंखालील), शिवम त्यागी (74 किलोंखालील), ऋषभ (80 किलोंखालील), गुलशन (74 किलोंखालील) आणि प्रीतम यादव (84 किलोपेक्षा जास्त).


महत्त्वाच्या इतर बातम्या  :


Virat Kohli : कोहलीची 'विराट' कामगिरी! 'हा' विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील


Maharashtra Board HSC Result 2023 LIVE हा निकाल एबीपी माझाच्या http://mh12.abpmajha.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे.


निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'चा लाईव्ह ब्लॉग पाहा