IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टीम इंडिया टी - 20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात आज पहिल्या टी - 20 सामना खेळला जाणार आहे. हा पहिला टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. मात्र मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाले. ज्यांच्या जागी, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे.


हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे केएल राहुल संघाचा बाहेर झाला आहे. यामुळेच आता कर्णधार रोहित शर्माला सलामी जोडीदाराचा शोध घ्यावा लागणार आहे. टी-20 मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडेच्या पहिल्या सामन्यात, रोहितने इशान किशनसह डावाची सुरुवात केली होती. तर उर्वरित दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ऋषभ पंत आणि शिखर धवन कर्णधार रोहितसोबत सलामीला आले होते. पहिल्या टी-20 सामन्यात ईशान किशनला ओपनिंगची संधी मिळू शकते. मात्र देशानंतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाड याचीही पहिल्याच सामन्यात ओपनिंगसाठी दावेदारी मजबूत आहे.







कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा पहिला टी20 सामना आज (16  फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. 


टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव


संपूर्ण टी-20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)


हे ही वाचा :