Bappi Lahiri : ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले.  वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. बप्पी लाहिरी हे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शोमध्ये वेगवेगळे दागिने घालून उपस्थित राहात होते. एका मुलाखतीमध्ये बप्पी लाहिरी यांनी त्यांच्या दागिन्यांवरील प्रेमाबद्दल सांगितलं होते. 

मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप स्टार एल्विस प्रेस्ली हा खूप आवडत होता. त्यांनी सांगितले , 'तो पॉप स्टार हा सोन्याची चैन घालत होता. मी एल्विस प्रेस्ली यांच्याकडे पाहून असा विचार करत होतो की, मला जेव्हा प्रसिद्ध मिळेल तेव्हा मी त्याच्यासारखी माझी इमेज तयार करेन.' तसेच बप्पी लाहिरी हे सोनं आणि चांदीच्या दागिन्यांना लकी देखील मानत होते. 

2014 मधील एका रिपोर्टनुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती. तसेच ते एकूण 20 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बप्पी लाहिरी यांच्या पत्नी चित्रानी यांच्याकडे 967 ग्रॅम सोनं, 8.9 किलोग्रॅम चांदी आणि चार लाख रूपयांपेक्षा ज्यास्त किंमतीचे हिरे होते.

बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली. बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधील गाणी संगीतबद्ध केली.

संबंधित बातम्या

Bappi Lahiri : 'डिस्को' सिंगर हरपला! शेकडो गाण्यांना दिला संगीताचा साज; अनेक गाणी गायली, बप्पीदांची सदाबहार गाणी

 Bappi Lahiri Passed Away : 'गोल्डन सिंगर' बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha