तत्पूर्वी शिमरॉन हेटमायर आणि एविन लुईसच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत पाच बाद 207 धावांचा डोंगर उभारला होता. हेटमायरनं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतले पहिले अर्धशतक झळकावताना 56 धावा कुटल्य़ा. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सलामीच्या लुईसनेही अवघ्या 17 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 40 धावा फटकावल्या. तर कर्णधार कायरन पोलार्डने 37 धावांचं योगदान दिलं. त्यानेदेखील चार षटकार ठोकले. भारताकडून यजुवेंद्र चहलने 36 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडले. तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
हैदराबादमध्ये टीम इंडियाकडून टी-20 सामन्यात सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग
हैदराबादमधल्या आजच्या सामन्यात टीम इंडियाने 208 धावांचा यशस्वी पाठलाग केला. टी-20 क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात भारताने केलेला हा सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ठरला.
भारताकडून धावांचा यशस्वी पाठलाग
208 वि. विंडीज (2019)
207 वि. श्रीलंका (2009)
202 वि. ऑस्ट्रेलिया (2013)
199 वि. इंग्लंड (2016)
198 वि. ऑस्ट्रेलिया (2018)
दरम्यान, के. एल. राहुलने आज त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतल्या एक हजार धावांचा टप्पा पार केला. हा पल्ला गाठणारा राहुल सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.