IND vs SL : मोहालीत आजपासून भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.  हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. विराटने आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये 45 धावा केल्या आहेत. विराटने पाच चौकरांसह 45 धावा केल्या आहेत. कोहलीला स्पिनर लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले.  परंतु विराट कोहली 100 व्या कसोटी सामन्यात 45 धावांवर बाद होण्याची भविष्यवाणी एक दिवस अगोदरच करण्यात आली होती. आश्यर्याची गोष्ट म्हणजे ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. 


श्रुती नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून सामना सुरू होण्याअगोदर जवळपास 10 तास अगोदर भविष्यवाणी करण्यात आली होती. 100 व्या कसोटी सामन्यात विराट 45 धावा करेल आणि त्याला  एम्बुलडेनिया बाद करेल. बाद झाल्यानंतर विराट नाराज झाला. 


 






श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीच्या बाबतीत ज्या पद्धतीने ट्वीटमध्ये लिहिले त्याप्रमाणे घडले आहे. दरम्यान  ट्विटमध्ये लिहिले होते की, कोहली 100 चेंडूमध्ये 45 धावा करणार परंतु कोहलीने 76 चेंडूमध्ये 45 धावा केल्या आहेत. 


कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha