IND vs SA 1st Test: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं रद्द करण्यात आलाय. सेंच्युरियनमध्ये काल (रविवारी, 26 डिसेंबर) रात्रभर पाऊस सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबल्याची माहिती समोर आली होती. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता पंच परिस्थितीची पाहणी करून खेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेणार होते. मात्र, पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आलाय. 


सेंच्युरिअर कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मैदानात जोरदार पाऊस झाला. पाऊस आणि ओले असलेल्या मैदानामुळे पहिल्या सत्राचा खेळ झाला नाही. यामुळं वेळेआधीच लंच ब्रेकची घोषणा करण्यात आली. तसेच आता साधारण 3-3.15 वाजता पंच मैदानाची आणि खेळपट्टीची पाहणी करून सामन्याला सुरुवात करणार होते. परंतु, पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं दुसऱ्या दिवसाचा खेळ अखेर रद्द करण्यात आलाय. 


या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतानं 3 गडी गमावून 272 धावा केल्या. या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. केएल राहुलनं नाबाद 122 धावा केल्या आहेत. तर, अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळत आहे. केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात चौथ्या विकेट्ससाठी 73 धावांची भागीदारी केलीय. राहुलनं सलामीला साकारलेल्या सातव्या शतकासह मयांक अगरवालनंही अर्धशतकी (60 धावा) योगदान दिलं. यामुळं भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA


हे देखील वाचा-