Corona Virus New Variant: कोरोना प्रादुर्भावातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं जगाची धास्ती वाढवली आहे. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron Variant) ने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतासह अनेक देशामध्ये (India) ओमायक्रॉनसोबतच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. परंतु, या व्हेरियंटसोबतच आणखी एका व्हायरसनं आता धडक दिली आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन आणि डेल्टा (Delta Variant) यांच्याशी मिळता जुळता व्हेरियंट आढळून आला आहे. पण हा डेल्मिक्रॉन नक्की आहे काय? आणि याची लक्षणं काय? हे जाणून घेऊयात... 


काय आहे  डेल्मिक्रॉन? (What is Delmicron)
डेल्मिक्रॉन कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट दोघांमध्ये एक-एक खास गुण आहे. डेल्टा व्हेरियंट अत्यंत घातक आहे आणि ओमायक्रॉनचा अधिक संसर्गजन्य आहे. अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, गेल्या महिन्यापर्यंत अमेरिकेतील 99 टक्के प्रकरणे डेल्टा प्रकारातील होती. पण, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. अमेरिकेत ओमिक्रॉनमुळं एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केलाय. 


डेल्मिक्रॉनची लक्षणे काय आहेत?
डेल्मिक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार नाही. डेल्मिक्रॉन डेल्टा आणि ओमायक्रॉनचं मिश्रण असल्यानं तो अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असू शकतो. डेल्मिक्रॉनबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्यानं संशोधन करीत आहेत.  परंतु, अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, डेलमिक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंट सारखीच वैशिष्ट्ये असतील. खूप ताप येणे, खोकला, चव आणि वासावर वाईट परिणाम होणं, तीव्र डोकेदुखी, घसा खवखवणे अशी डेल्मिक्रॉनची लक्षणे असू शकतात.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha