Highest Paid Captain: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मानधन घेणार्‍या कर्णधारांची चर्चा केली तर, चाहत्यांच्या मनात टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव प्रथम येते. पण प्रत्यक्षात तसं नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की  विराट कोहलीपेक्षा इंग्लंचा कसोटी कर्णधार जो रूटला जास्त मानधन मिळतं. तर, आज आपण कोणत्या कर्णधाराला किती मानधन मिळतं याची यादी पाहूया. या यादीत विराट कोहली नेमकं कितव्या क्रमांकावर आहे? याबाबत जाणून घेऊयात. 


दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा
दिमुथ करुणारत्ने कसोटी फॉरमॅटमध्ये श्रीलंका संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी संभाळत आहे. त्याला एका वर्षाला 51.03 लाख रुपये मानधन मिळतं. तर, मर्यादित षटकांमध्ये श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व कणाऱ्या कुशल परेराचं वार्षिक वेतन 25 लाख रुपये इतकं आहे.


बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघानं टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. बाबर आझमला दरवर्षी 62.40 लाख मानधन मिळतं. 


कायरन पोलार्ड आणि क्रेग ब्रेथव्हेट
कायरन पोलार्ड  वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकाचं तर, क्रेग ब्रेथव्हेट कसोटी संघाचं नेतृत्व करत आहेत. दरम्यान, पोलार्डला दरवर्षी 1.73 कोटी मानधन मिळतं. तर, ब्रेथव्हेटला 1.39 कोटी वार्षिक मानधन मिळतं. 


केन विल्यमसन
केन विल्यमसन दीर्घकाळापासून न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ  टी-20 विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय न्यूझीलंड संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीवरही कब्जा केला होता. विल्यमसनचं वार्षिक उत्पन्न 1.77 कोटी रुपये इतके आहे.


डीन एल्गर आणि टेंबा बावुमा
कसोटी फॉर्मेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गरकडे आहे, तर मर्यादित षटकांमध्ये टेंबा बावुमाकडे ही जबाबदारी आहे. एल्गारला 3.2 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो, तर बावुमाला 2.5 कोटी रुपये मिळतात.


आरोन फिंच
ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कर्णधारांपैकी एक आहे. फिंच मर्यादित षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याला दरवर्षी एक मिलियन डॉलर्स मानधन मिळतं.


विराट कोहली
आता आपण टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलूया. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीसीसीआयकडून त्याला दरवर्षी सात कोटी रुपये मानधन मिळतं. कोहली बोर्डाच्या केंद्रीय कराराच्या A+ श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूच्या यादीत येतो.


इऑन मॉर्गन
इऑन मॉर्गन मर्यादित षटकांमध्ये इंग्लंड संघाचं कर्णधारपद संभाळत आहे. तर, कसोटी संघाचं नेतृत्व जो रूटकडे आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड या दोन्ही कर्णधारांना मोठी रक्कम देते. रूटला दरवर्षी 8.97 कोटी रुपये तर, तर मॉर्गनला 1.75 कोटी रुपये इतकं मानधन दिलं जातं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-