IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना टीम इंडियानं गमावल्यानंतर संघावर टीका होत आहे.  टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी संघात बदलाबाबतचे संकेत दिले आहेत. विराटनं म्हटलं आहे की, संघाच्या खेळाची समीक्षा केल्यानंतर चांगल्या खेळाडूंना संघात घेतलं जाईल जे चांगल्या खेळाची चांगल्या मानसिकतेसह मैदानात उतरतील. 


कोहलीनं कुणाचंही नाव न घेत म्हटलं की, काही खेळाडू या सामन्यात रन बनवण्याचा प्रयत्नच करत नव्हते. कोहलीच्या या वक्तव्यावरुन असं लक्षात येतं आहे की, काही वरिष्ठ खेळाडूंना काही वेळ दिला जाऊ शकतो. तसेच इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाच जागा मिळेल.  


IND vs NZ, WTC 2021 Result: न्यूझीलँड कसोटीचा बादशाह! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप


कोहलीनं सामना संपल्यानंतर म्हटलं होतं की, आम्ही आत्ममंथन करत आहोत. संघाच्या मजबूतीसाठी काय करावं लागेल यावर आता लक्ष केंद्रित केलं जाईल. आमच्याकडे वनडे, टी 20 साठीचा संघ मजबूत आहे. टेस्टमध्ये देखील याची गरज आहे, असं कोहली म्हणाला. 


ICC Test Rankings : आयसीसीकडून टेस्ट रँकिंग घोषित, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा नंबर वन


तो म्हणाला की, आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. संघासाठी काय महत्वाचं आहे यावर विचार केला जाईल. योग्य लोकांना खेळवणं जे चांगली खेळी करतील आणि ते देखील चांगल्या मानसिकतेसह खेळतील अशा खेळाडूंना आणावं लागेल. आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, असंही विराट कोहली म्हणाला.  


WTC फायनलमध्ये भारताचा आठ विकेट्सने पराभव


WTC अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.  भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 139 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलँडच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजांनी लवकर बाद केलं. लॅथम 9 तर कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. मात्र यानंतर आलेल्या केन विलियमसन आणि रॉस टेलरनं कुठलीही पडझड न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. 



भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार
हा कसोटी विश्वचषकाचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.