IND vs NZ 1st Test, LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट

IND vs NZ 1st Test, Day 3 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस. प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 27 Nov 2021 10:27 AM
चौथ्या दिवशीचाा खेळ संपला, न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची गरज

चौथ्या दिवशी भारताने जबरदस्त खेळ दाखवला आहे. अय्यर आणि साहा यांनी अर्धशतक झळकावत भारताला 234 धावांपर्यत पोहोचवलं. ज्यानंतर भारताने डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांच आव्हान दिलं. ज्यानंतर दिवसाच्या शेवटी भारताने न्यूझीलंडचा सलामीवीर यंगला बाद केलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची गरज असून त्यांच्या हातात 9 गडी आहेत.

भारताला मोठं यश, विल यंग बाद

भारतासाठी आजचा दिवस चांगला ठरत असून 283 धावांचं आव्हान न्यूझीलंडला दिल्यानंतर भारताने तिसऱ्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगलाही तंबूत धाडलं आहे. आश्विनने त्याला पायचीत केलं आहे.

भारताकडून 234 धावांवर डाव घोषित, न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचे आव्हान

चौथ्या दिवशीच्या सुरुवातीला खराब खेळ दाखवल्यानंतर भारताकडून श्रेयस आणि साहा यांनी अर्धशतक झळकावलं. तर आश्विननेही 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे भारताने 234 धावांपर्यंत मजल मारली असून आता डाव घोषित केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांची गरज आहे.


 

साहाचं संयमी अर्धशतक

भारताचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहाने आज अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सावरलं आहे. त्याने नुकतचं अर्धशतक पूर्ण केलं असून तो अक्षर पटेलसह फलंदाजी करत आहे. भारताने 270 धावांची आघाडी घेतली आहे.

श्रेयस नावाचं वादळ थांबलं, दुसऱ्या डावात 65 धावा करुन बाद

सामन्यातील दोन्ही डावात अप्रतिम कामगिरी करणारा श्रेयस अय्यर अखेर बाद झाला आहे. 65 धावांवर अय्यर बाद झाला असून साऊदीच्या चेंडूवर ब्लंडलने त्याचा झेल घेतला आहे. भारताची अवस्था 60.2 ओव्हरनंतर 167 वर 7 बाद अशी आहे. 

अय्यर-साहाची अर्धशतकी भागिदारी पूर्ण

भारताच्या चौथ्या दिवशीची सुरुवात खराब झाली असताना श्रेयससह आणि साहा यांनी भारताचा डाव सांभाळला आहे. दोघांची अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली असून दोघेही सध्या क्रिजवर आहेत.


श्रेयसचा धमाका सुरुच, अर्धशतक पूर्ण

पदार्पणाच्या कसोटीतील दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी सुर ठेवली आहे. सर्व संघ तंबूत परतत असताना अय्यरने टिकून खेळून आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 56 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 156 वर 6 बाद आहे.

भारताला मोठा झटका, आर आश्विन बाद

सर्व फलंदाज तंबूत परतत असताना भारताचा डाव सांभाळणारा आर आश्विनही बाद झाला आहे. काईय जेमिसनने त्याला 32 धावांवर बाद केलं आहे. आता रिद्धिमान साहा फलंदाजीला आला आहे.

आश्विन-अय्यरने सांभाळला डाव

चौथ्या दिवशीच्या सुरुवातीपासून भारताचे फलंदाज तंबूत परतत असताना अय्यर आणि आश्विन यांनी भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने 100 धावांचा टप्पा पार केला असून 38 षटकानंतर भारताची स्थिती 102 वर 5 बाद अशी आहे.

चौथ्या दिवशी भारताची खराब सुरुवात, निम्मा संघ तंबूत परत

तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडला सर्वबाद केलं. पण दिवसाच्या शेवटी 14 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर चौैथ्या दिवशीच्या सुरुवातीपासून एक एक करत खेळाडू तंबूत परतत आहेत. लंचब्रेक पूर्वी भारताची स्थिती 84 वर 5 बाद अशी आहे.

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताची स्थिती 14 धावांवर एक बाद

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. भारताने अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंडला 296 धावांवर सर्वबाद केलं. पण फलंदाजीला सुरुवात होताच शुभमन 1 धाव करुन बाद झाला आहे. पण तरी भारत 63 धावांनी पुढे आहे.

भारताची खराब सुरुवात, गिल तंबूत परत

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातच खराब झाली आहे. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा शुभमन गिल दुसऱ्या डावात 1 धाव करुन बाद झाला आहे. कायल जेमिसनने पहिली विकेट टीपली आहे.

न्यूझीलंडचा डाव आटोपला

न्यूझीलंचा पहिला डाव 296 धावांवर रोखण्यात भारताला यश आलं आहे. सध्या भारत 49 धावांनी पुढे असून थोड्याच वेळात फलंदाजीला मैदानात येईल. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स टिपले आहेत.

अक्षरच्या फिरकीची जादू सुरुच, न्यूझीलंडचे 8 गडी बाद

आजच्या दिवशी भारताकडून अक्षर पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी सुरुच ठेवली आहे. त्याने टीम साऊदी आणि टॉम ब्लंडलला बाद करत डावातील 5 बळीही पूर्ण केले आहेत. 129 ओव्हरनंतर न्यूझीलंडची स्थिती 270 वर 8 बाद अशी आहे.

न्यूझीलंडला 6 वा झटका, रवींद्रने टीपला रवींद्रचा विकेट

न्यूझीलंडचा सहावा गडी बाद झाला आहे. रवींद्र जाडेजाने न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्रचा बळी टीपला आहे.

अक्षरला तिसरं यश, न्यूझीलंडला मोठा झटका

न्यूझीलंडचा सलामीवीर डावाच्या सुरुवातीपासून टिकून होता. त्याला अखेर अक्षरने बाद केलं आहे. टॉम लेथम 95 धावांवर बाद झाला असून 228 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

अक्षरच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडचे दोन गडी बाद

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंना तंबूत धाडलं आहे. रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स या दोघांना अक्षरने बाद केलं आहे. 

लंचब्रेकपूर्वी न्यूझीलंडची अवस्था 197/2

तिसऱ्या दिवशीचं पहिलं सेशन संपलं असून न्यूझीलंडने दोन गडी गमावत 197 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. टॉम लेथम 82 धावांवर खेळत आहे.

न्यूझीलंडला दुसरा झटका, कर्णधार विल्यमसन बाद

मोठ्या प्रयत्नानंतर न्यूझीलंडचा पहिला गडी बाद झाल्यानंतर आता दुसरी विकेटही पडली आहे. उमेश यादवने त्याला पायचीत केलं आहे.

अश्विनने मिळवून दिलं भारताला पहिलं यश

फिरकीपटू आर. अश्विन यानं भारताला पहिलं यश मिळवून दिलेय. अश्विन यानं विल यंग याला 89 धावांवर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलेय. न्यूझीलंड संघाने सध्या एक गड्याच्या मोबदल्यात 161 धावा केल्या आहेत. कर्णधार विल्यमसन आणि टॉम लेथम मैदानावर आहेत.  

दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, न्यूझीलंड 129/0

भारताने 345 धावाचं तगडं आव्हान ठेवलं असलं तरी न्यूझीलंडनेही चोख सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशीच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडचा संघ एकही विकेट न गमावता 129 धावांपर्यंत पोहोचला आहे. टॉम लॅथम (50) आणि विल यंग (75) क्रिजवर आहेत. 

भारताच्या तगड्या आव्हानासमोर न्यूझीलंडची दमदार सुरुवात

भारताने 345 धावांची मोठी धावसंख्या निर्माण केल्यानंतर न्यूझीलंडनेही चोख सुरुवात केली आहे. एकही विकेट न गमावता न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी जबरदस्त धावसंख्या उभी केली आहे.

भारताचा पहिला डाव 345 धावांवर संपुष्टात, श्रेयस अय्यरचं शतक, टीम साऊथीच्या 5 विकेट्स

भारताचा पहिला डाव 345 धावांवर संपुष्टात, श्रेयस अय्यरचं शतक, टीम साऊथीच्या 5 विकेट्स

साऊदी-जेमिसनचा भेदक मारा

अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि युवा गोलंदाज जेमिसन यांनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं आहे. साऊदीने पाच तर जेमिसन याने तीन विकेट्स घेतल्या आहेत. 

अश्विनची एकाकी झुंज

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव ढेपाळलाय. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. रविचंद्र अश्विनचा अपवाद वगळता एकाही फलंदाला खेळपट्टीवर थांबता आलं नाही. अश्विन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघांच्या 338 धावा झाल्या आहेत. 

मुंबईकर श्रेयस अय्यरची पदार्पणात शतकी खेळी

 कानपूर कसोटी सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने पदार्पणात शतकी खेळी साकारली आहे. 13 चौकार आणि दोन षटकारांसह अय्यरने शतकी खेळी केली

कानपूर कसोटीत भारताची चांगली सुरुवात

सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला. आता अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत आहेत.





 


श्रेयसचा पदार्पणातच धमाका

श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.  श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं.  पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे. त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचण्याची संधी आहे. याआधी भारताकडून 14 खेळाडूंनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली आहे. 


 
भारतीय संघाची पहिल्या दिवशी चांगली सुरुवात

IND vs NZ 1st Test Kanpur : कानपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आहे.  दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत आहे. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. शिवाय आज श्रेयस अय्यरकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची संधी त्याच्याकडे आहे. 

पार्श्वभूमी

IND vs NZ 1st Test Kanpur : कानपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आहे.  दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत आहे. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. शिवाय आज श्रेयस अय्यरकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची संधी त्याच्याकडे आहे. 



श्रेयसचा पदार्पणातच धमाका


श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.  श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं.  पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे. त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचण्याची संधी आहे. याआधी भारताकडून 14 खेळाडूंनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली आहे. 


या भारतीयांनी ठोकलंय पदार्पणाच्या कसोटीत शतक
लाला अमरनाथ, दीपक शोधन, एजी कृपाल सिंह, अब्बास अली बैग, हनुमंत सिंह, गुंडाप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण आमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा या खेळाडूंनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 


कानपूर कसोटीत भारताची चांगली सुरुवात
सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला. आता अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.