Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल

Parliament Session 2024 Live Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत (PM Narendra Modi Rajya Sabha Speech.) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं.

नामदेव जगताप Last Updated: 03 Jul 2024 12:40 PM

पार्श्वभूमी

Parliament Session 2024 Live Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं. लोकसभा सभागृहात काल विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं निवेदन...More

पुढची पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढासाईसाठी निर्णायक, देश नक्की विजयी होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की येथे काही लोक बसले आहेत जे म्हणतात की यात काय आहे, हे होणारच आहे. त्यांना ऑटो पायलट मोडमध्ये सरकार चालवण्याची सवय आहे, वेटिंगवर विश्वास ठेवतात. मात्र आमचा आमच्या मेहनतीवर विश्वास आहे.सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्यासाठी ज्या प्रकारची शासनाची गरज आहे, तसं शासन आम्ही देऊ. आगामी पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढाईतील निर्णायक वर्षे आहेत. गरिबीविरुद्धच्या लढाईत हा देश विजयी होईल, हे मी १० वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे. जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनतो तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. विस्तार आणि विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.