India vs New Zealand Hockey Match Highlights: ओडिशा येथील भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारताचा (India) पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय (India) संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर झाला आहे. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) विजय मिळवला आहे.
पहिल्या चार क्वार्टरमध्ये म्हणजेच सामन्याच्या निर्धारित वेळेत सामना 3-3 असा बरोबरीत होता. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने (India) 2 तर न्यूझीलंडने (New Zealand) 1 गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत (India) आणि न्यूझीलंडने (New Zealand) 1-1 गोल केला. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) 1 गोल केला. अशाप्रकारे हा सामना निर्धारित वेळेत 3-3 असा बरोबरीत सुटला.
यानंतर नियमाप्रमाणे सामन्याचा निकाल हा शूटआऊटने घेतला जाणार होता. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंड (New Zealand) संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ 24 जानेवारीला गतविजेत्या बेल्जियमशी पडेल. आता उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडचा (New Zealand) संघ बेल्जियमशी भिडणार आहे
पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांची कामगिरी
भारत | न्युझीलँड |
हरमनप्रीतने केला गोल | केन रसेलने गोल केला |
राजकुमार पालने गोल केला | शॉन फिडलने गोल केला |
अभिषेकचा गोल चुकला | निक वुड्सने गोल केला |
समशेर सिंगचा गोल चुकला |
सॅम लेनचा गोल चुकला
|
सुखजित सिंगने गोल केला
|
सॅम हिहा गोल चुकला
|
हरमनप्रीत सिंगचा गोल चुकला
|
निक वुड्सचा गोल हुकला
|
राजकुमार पालने गोल केला
|
शॉन फिंडलेने गोल केला
|
सुखजित सिंग गोल चुकला
|
हेडन फिलिप्सचा गोल हुकला
|
समशेर सिंगचा गोल चुकला
|
सॅम लीनने गोल केला
|
इतर महत्वाची बातमी: