IND vs AFG Rohit Sharma :  भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) इंदुर (Indur) येथे खेळवण्यात आलेल्या टी 20 मालिकेतील दुसऱ्या टीम इंडियाने (Team India) दिमाखदार विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानचा 6 विकेट राखत धुव्वा उडवलाय. या विजयासोबतच भारतीय संघाने अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेत विजय मिळवलाय. भारतीय संघाच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चेहऱ्यावर स्मितहास्य होते. तो फार आनंदी होता. रोहित 14 महिन्यांनंतर टी 20 सामना खेळत होता. त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, युवा खेळाडूंनी चांगलीच फटकेबाजी केली. त्यामुळे त्यामुळे रोहितने युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 


काय म्हणाला रोहित शर्मा? (IND vs AFG Rohit Sharma)


रोहित शर्मा म्हणाला (Rohit Sharma), "हा फार मोठा प्रवास होता. ज्याची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. मी मैदानावर प्रत्येक क्षणाला मनात कैद करुन ठेवलय." युवा खेळाडूंच्या कामगिरीवर बोलताना रोहित म्हणाला की, आम्हाला काय करायचे आहे? याबाबत आम्हाला स्पष्टता होती. त्यामुळे प्रत्येकाला स्पष्टपणे त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले होते. आम्ही खेळाडूंनीही तशीच कामगिरी केली. आपली टीम जेव्हा अशी कामगिरी करते, तेव्हा आपल्याला गर्व वाटतो. मागील दोन सामन्यात आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. 


शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालचे तोंड भरुन कौतुक (IND vs AFG Rohit Sharma)


अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालने तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावरच भारताने विजय मिळवला. शिवम आणि यशस्वीच्या कामगिरीबाबत बोलताना रोहित म्हणाला, त्याच्यासाठी गेली काही वर्षे अतिशय चांगली होती. जैस्वालने कसोटी क्रिकेट आणि आता टी20 मध्येही चमक दाखवली आहे. त्यांनी त्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्याकडे चांगले शॉट आहेत. शिवम दुबे चांगली उंची असलेला खेळाडू आहे. तो ताकदवान आहे. फिरकीपटूंचा तो चांगला रितीने सामना करतो. तीच त्यांची या सामन्यासाठी भूमिका होती. टीमसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 


मैदानावर उतरताच रोहितच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद (IND vs AFG Rohit Sharma)


अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार रोहित शर्मावर होते. रोहित शर्माने रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित टी 20 फॉरमॅटमध्ये 150 सामने खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. रोहितने आत्तापर्यंत 149 सामने खेळले होते. रोहितनंतर सर्वाधिका सामने खेळणाऱ्यांच्या यादीत आयर्लंडच्या खेळाडूचा समावेश आहे. पॉल स्टर्लिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 सामने खेळले आहेत. त्यानंतर पाकिस्तानच्या शोएब मलिकने 124 तर मार्टिन गुप्टीलने 122 सामने खेळले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


IND vs AFG 2nd T20 Highlights : यशस्वी अन् शिवम दुबेच्या तुफानी वादळात अफगाणिस्तानची अक्षरश: धुळदाण; टीम इंडियाने मालिका जिंकली!