India vs Afghanistan 2nd T20 : टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवत मालिका जिंकली

India vs Afghanistan 2nd T20 LIVE Score : टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. कर्णधार रोहित शर्माला सलामीच्या जोडीदाराची गरज आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 14 Jan 2024 10:17 PM
टीम इंडियाने मालिका जिंकली

भारताने दुसरा T20 सामना जिंकला आहे. भारताने 173 धावांचे लक्ष्य 15.4 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. शिवम दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. जैस्वालने 34 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने तीन, अक्षर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन बळी घेत अफगाणिस्तानला 172 धावांत रोखले.

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : इंदूरच्या मैदानात यशस्वी अन् शिवम दुबेचा षटकारांचा पाऊस; अफगाणी गोलंदाजी सपशेल गंडली

इंदूरच्या मैदानात यशस्वी अन् शिवम दुबेचा षटकारांचा पाऊस; अफगाणी गोलंदाजी सपशेल गंडली



  • IND 134/2 (11)  CRR: 12.18  

  • Shivam Dube *35

  • Yashasvi Jaiswal *68

किंग कोहली तब्बल 429 दिवसांनी टी-20 संघात परतला, पण विराट पराक्रम थोडक्यात हुकला

किंग कोहली तब्बल 429 दिवसांनी टी-20 संघात परतला, पण 'विराट' पराक्रम अवघ्या सहा धावांनी हुकला! 


कोहली 29 धावा करून बाद 


35 धावा केल्या असत्या, तर टी20 मध्ये 12 हजार धावा पूर्ण झाल्या असत्या. 


 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : रोहित बाद होताच यशस्वी कोहलीकडून कडाडून हल्लाबोल; 5 षटकांत पन्नाशी पार

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : रोहित बाद होताच यशस्वी कोहलीकडून कडाडून हल्लाबोल; 5 षटकांत पन्नाशी पार 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : हिटमॅन रोहित शर्मा शुन्यावर बाद, किंग कोहली मैदानात, दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह

हिटमॅन रोहित शर्मा शुन्यावर बाद, किंग कोहली मैदानात, दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह



  • IND 32/1 (3)  CRR: 10.67 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानने टीम इंडियाला झोडले; विजयासाठी 172 धावांचे आव्हान

अफगाणिस्तानने टीम इंडियाला झोडले; विजयासाठी 172 धावांचे आव्हान 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानला सहावा धक्का, नजीबुल्लाह झद्रान बाद

अफगाणिस्तानला सहावा धक्का, नजीबुल्लाह झद्रान 23 धावांवर बाद 



  • AFG 134/6 (17.1)  CRR: 7.81

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानला पाचवा धक्का, नबी 14 धावा करून बाद

 अफगाणिस्तानला पाचवा धक्का, नबी 14 धावा करून बाद 



  • AFG 112/5 (15.3)  CRR: 7.23

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानला चौथा धक्का

अफगाणिस्तानला चौथा धक्का बसला गुलबदीन 35 चेंडूत 57 धावा करून बाद, अक्सर पटेलने घेतली विकेट



  • AFG 93/4 (12.1)  CRR: 7.64

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : गुलबदीन नईबचे शानदार अर्धशतक; अफगाणिस्तान 10 षटकात 3 बाद 81

गुलबदीन नईबचे शानदार अर्धशतक; अफगाणिस्तान 10 षटकात 3 बाद 81 



  • AFG 81/3 (10)  CRR: 8.1

  • Gulbadin Naib *50

  • Mohammad Nabi4

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानला लागोपाठ दोन धक्के

अफगाणिस्तानला लागोपाठ दोन धक्के, अक्सर पटेल आणि शिवम दुबेला प्रत्येकी एक विकेट 


AFG 60/3 (6.5)  CRR: 8.78


 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानची 5 षटकांत पन्नाशी पार

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानची 5 षटकांत पन्नाशी पार



AFG 50/1 (5) CRR: 10


 


Gulbadin Naib *26
brahim Zadran *7


IND vs AFG 2nd T20 LIVE Score : रवी बिश्नोईचा अफगाणला पहिला धक्का; गुरबाद बाद

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : रवी बिश्नोईचा अफगाणला पहिला धक्का; गुरबाद बाद 


AFG 20/1 (2.2)
IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानच्या 2 षटकांत नाबाद 20 धावा, अंपायर काॅलने पहिली विकेट हुकली

IND vs AFG 2nd T20 LIVE Score :  अफगाणिस्तानच्या 2 षटकांत नाबाद 20, अंपायर काॅलने पहिली विकेट हुकली

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तान आणि टीम इंडियाची प्लेइंग 11

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कॅप्टन), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : टीम इंडियात दोन बदल, कोहलीचं कमबॅक, जैस्वालही संघात

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : टीम इंडियात दोन बदल, कोहलीचं कमबॅक, जैस्वालही संघात परतला. गिल आणि तिलक वर्माला वगळले 

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IND vs AFG 2nd T20 LIVE Score : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पार्श्वभूमी

India vs Afghanistan 2nd T20 LIVE Score : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. भारतीय खेळाडू विश्वचषकापूर्वी आयपीएलमध्ये नक्कीच खेळतील, पण कोणत्याही संघासोबत मालिका खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर भारत-अफगाणिस्तान मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषत: भारतीय संघ सलामीवीराच्या शोधात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सलामीच्या जोडीदाराची गरज आहे.


रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार?


T20 विश्वचषकापूर्वी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार? खरे तर, गेल्या 14 महिन्यांत रोहित शर्माचे भागीदार म्हणून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलसह 5 फलंदाजांचा शोध घेण्यात आला, परंतु हा शोध अद्याप पूर्ण झालेला दिसत नाही. विश्वचषकापूर्वी रोहित शर्मासाठी परफेक्ट ओपनिंग पार्टनर शोधणे हे टीम मॅनेजमेंटसाठी मोठे आव्हान बनले आहे.


गेल्या T20 विश्वचषकापासून ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना रोहित शर्माचे सलामीचे भागीदार म्हणून प्रयत्न केले गेले, परंतु हा शोध पूर्ण झालेला नाही. याशिवाय केएल राहुल आणि संजू सॅमसन यांना सलामीवीर म्हणून प्रयत्न केले गेले, परंतु ते विश्वासात बसले नाहीत. 


रोहित शर्माने केएल राहुलसह सर्वाधिक 15 वेळा डावाची सुरुवात केली. रोहित शर्माने इशान किशनसोबत 5 वेळा सलामी दिली. तर ऋषभ पंत रोहित शर्मासोबत तीन वेळा सलामीवीर म्हणून आला. सूर्यकुमार यादव 2 सामन्यात रोहित शर्माचा जोडीदार बनला. तसेच संजू सॅमसनला सलामीची संधी मिळाली. मात्र, टी-20 विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून कोणत्या फलंदाजाला आजमावले जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे.


दुसऱ्या T20 साठी भारताचा संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, कुलदीप यादव. , आवेश खान.


दुसऱ्या T20 साठी अफगाणिस्तानचा संघ


रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबद्दीन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, हजरतुल्ला झाझाई, फरीद अहमद मलिक, शराफुद्दीन अश्रफ, इकराम अलीखिल, कैस अहमद, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.