मुंबई : इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी 15 जणांचा समावेश असलेल्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 क्रिकेटपटूंशिवाय आणखी चार खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांना टीम इंडियाच्या नेट सरावासाठी इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.

हे चौघं क्रिकेटपटू विश्वचषक दौऱ्यात भारतीय संघाला मदत करतील. खलील अहमद, आवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी हे चारही गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळणाऱ्या नवदीप सैनीच्या वेगवान गोलंदाजीवे सर्वजण प्रभावित आहेत. चेन्नईकडून खेळणाऱ्या दीपक चाहरने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये दहा विकेट्सही जमा झाल्या आहेत.

VIDEO | संपत्तीसाठी मुलीकडूनच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या | नागपूर | एबीपी माझा



खलील आणि आवेश यांनी यंदा आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवलेली नसली, तरी त्यांच्या प्रभावी माऱ्याचा टीम इंडियाला नेट प्रॅक्सिस करताना फायदा होईल, असा विश्वास निवडकर्त्यांना वाटतो.

विराट कोहलीच्या नेतृत्वात 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. बॅकअप विकेटकीपरच्या शर्यतीत दिनेश कार्तिकने रिषभ पंतला मागे टाकत संघात जागा मिळवली.

विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.

क्रिकेट विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.

भारताकडे काय आहे?

जगातील सर्वोत्कृष्ट तीन क्रिकेटपटू

जगातील सर्वोत्कृष्ट जलदगती गोलंदाज

दोन उत्कृष्ट जलदगती गोलंदाज

जगातील दोन उत्तम फिरकीपटू

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज

भारताकडे काय नाही?

मधळ्या फळीतला डावखुरा फलंदाज

डावखुरा जलदगती गोलंदाज

प्रस्थापित मधली फळी

दहा षटकं टाकू शकेल असा अष्टपैलू जो दोन प्रमुख गोलंदाजांना साथ देईल
संबंधित बातम्या

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?