ICC Rankings : भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) अल्प काळासाठीच क्रमवारीत अव्वल स्थानी राहू शकला. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) जाहीर केलेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC One Day Ranking) गिलला पहिल्या स्थानावरून बाजूला केलं आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान शुभमनने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, विश्वचषकानंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. बाबर 824 रेटिंग गुणांसह अव्वल तर शुभमन (810) दुसऱ्या स्थानावर आहे.


गिल न खेळल्याने नुकसान


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका न खेळल्यामुळे गिलचे नुकसान झाले आहे. बाबरने विश्वचषकानंतर एकही सामना खेळला नाही, तसेच त्याच्या संघाचा एकही सामना झाला नाही. यामुळे त्याचे रेटिंग पूर्वीसारखेच आहे. गिलनंतर भारतीय संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा क्रमवारीत समावेश आहे. श्रेयस अय्यर 12 व्या स्थानावर तर लोकेश राहुल एका स्थानाने 16 व्या स्थानावर घसरला आहे.


गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज अव्वल स्थानावर 


गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुसऱ्या आणि भारताचा मोहम्मद सिराज तिसऱ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह (पाचवा) आणि कुलदीप यादव (आठव्या) टॉप 10 मध्ये इतर भारतीय आहेत. मोहम्मद शमी 11व्या तर रवींद्र जडेजा 22व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत फारसा बदल झालेला नाही आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानावर कायम आहे. अव्वल 20 मध्ये जडेजा (12वा) आणि हार्दिक पंड्या (17वा) हे दोनच भारतीय आहेत.


बिष्णोई सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर घसरला


सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठणारा इंग्लंडचा आदिल रशीद हा देशातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी ग्रॅम स्वान या फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज बनला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत चार T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सात विकेट घेत त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खानला दुसऱ्या स्थानावर ढकलले. या यादीत भारताचा रवी बिश्नोई तिसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिबचे वर्चस्व कायम आहे, तर हार्दिक चौथ्या क्रमांकावर अव्वल भारतीय आहे.


कसोटी रँकिंग स्थिती


कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा जो रूट (दुसरा) आणि स्टीव्ह स्मिथ (तिसरा) आहे. या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित दहाव्या स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारताचा अनुभवी रविचंद्रन अश्विन पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर आहे.


पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार गोलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला, तर रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर घसरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे वर्चस्व टॉप 10 मध्ये आहे, ज्यामध्ये कमिन्स व्यतिरिक्त नॅथन लियान (पाचवा), मिचेल स्टार्क (आठवा) आणि जोश हेझलवुड (10वा) यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानावर आहेत तर अक्सर पटेल पाचव्या स्थानावर आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या