South Africa : वर्ल्डकपमध्ये खतरनाक कामगिरी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य होते, मात्र, न्यूझीलंड केवळ 167 धावांवरच मर्यादित राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते. न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. परिणामी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर
या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे 7 सामन्यांत 12 गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाचे 6 सामन्यांत 12 गुण आहेत. भारतीय संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे 12-12 गुण समान असले तरी चांगल्या नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे.
न्यूझीलंड अचानक गंडला
स्पर्धेत चांगली काम करत असतानाच न्यूझीलंडला पराभवाचे धक्के बसू लागले आहेत. टीम इंडियाने विजयरथ रोखल्यानंतर त्यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक झाली आहे. त्यामुळे 2019 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अत्यंत दुर्दैवाने पराभूत झाला होता. त्यानंतर या वर्ल्डकपची त्यांनी दमदार सुरु करूनही पराभवाच्या गर्तेत सापडला आहे.
दक्षिण आफ्रिका 'जखमी वाघ' झालाय
पहिल्यांदा फलंदाजी चालू स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं धडकी भरवली आहे. टीम इंडियात दमदार लयीत असतानाही दोनद प्रथम फलंदाजी करताना गंडली होती, पण साऊथ आफ्रिकेनं धावांचा पाऊस पाडला आहे. कमनशिबी असा शिक्का पुसून टाकण्यासाठीच त्यांची कामगिरी केली आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी किंवा फिल्डीग या संघाची दमदार कामगिरी सुरु आहे.
मागील आठ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 100 धावांपासून ते 229 धावांपर्यंत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर धावा करण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आघाडीवर आहे.
विश्वचषक 2023 आकडेवारी
- सर्वोच्च धावसंख्या: दक्षिण आफ्रिकेने 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट गमावून 428 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
- सर्वात मोठा विजय: 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांच्या फरकाने पराभव केला.
- सर्वाधिक धावा: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने या विश्वचषकात 545 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर किवी फलंदाज रचिन रवींद्र (415) दुसऱ्या स्थानावर आणि डेव्हिड वॉर्नर (413) तिसऱ्या स्थानावर आहे.
- सर्वात मोठी खेळी : हा विक्रमही डी कॉकच्या नावावर आहे. त्याने 24 ऑक्टोबर रोजी वानखेडेवर बांगलादेशविरुद्ध 174 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती.
- सर्वाधिक शतके: येथेही डी कॉक नंबर-1 आहे. या विश्वचषकात त्याने 4 शतके झळकावली आहेत.
- सर्वाधिक षटकार: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 20 षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर (19) दुसऱ्या स्थानावर तर डी कॉक (18) तिसऱ्या स्थानावर आहे.
- सर्वाधिक बळी: ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसिन यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 16-16 विकेट घेतल्या आहेत.
- सर्वोत्तम गोलंदाजी खेळी: पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 धावांत 5 बळी घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या