World Cup 2023 Points Table Update : पुण्याच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी दारुण पराभव करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केलाय. दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत पहिल्या स्थानवर झेप घेतली आहे.  दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर टीम इंडियाला फटका बसलाय तर ऑस्ट्रेलियाला फायदा झालाय. 


गुणतालिकेत नेमका काय बदल झाला ?


दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलेय. दक्षिण आफ्रिकेचा सात सामन्यातील हा सहावा विजय होता. दक्षिण आफ्रिका संघाने 12 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आफ्रिका आणि भारताचे समान गुण आहेत, पण नेटरनेरटमुळे टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.  तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. न्यूझीलंडचे सात सामन्यात तीन पराभव आणि चार विजय झालेत. 8 गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडच्या पराभवाचा फायदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांना झालाय. या संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्यचे चान्सेस आणखी वाढले आहेत. 


इतर संघाची स्थिती काय ?


श्रीलंकेचा पराभव करत अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली होती. पण अफगाणिस्तान संघ आता सहाव्या स्थानावर घसरलाय. पाकिस्तान संघाने पाचव्या स्थानावर  आहे.  सहा गुणांसह पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण सरस रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. श्रीलंका संघ सातव्या स्थानावर आहे.  श्रीलंका संघाचे सहा सामन्यात चार पराभव झालेत. नेदरलँडचा संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.446 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.  शाकीबच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. बांगलादेश संघाला सात सामन्यात फक्त दोन गुण मिळवता आलेत. बांगलादेशचा संघ फक्त अफगाणिस्तान संघाचा पराभव करु शकला.  बांगलादेशला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. 




न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा
दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या मोहिमेत आपला सहावा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा सात सामन्यांमधला सहावा विजय ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात भारताइतकेच 12 गुण झाले आहेत. पण सर्वोत्तम नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, पुण्यातल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रासी वॅन डेर ड्यूसेननं झळकावलेल्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं चार बाद 357 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर विजयासाठी 358 धावांचं आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी आक्रमणासमोर त्यांचा अख्खा डाव 167 धावांत आटोपला. केशव महाराजनं चार, तर मार्को यान्सेननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.