ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकात विश्वविजेत्या इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु विश्वचषक सुरू झाल्यानंतर इंग्लंडचा संघ अनेक दिवस गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिला. इंग्लंड संघाने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले असून केवळ 2 सामने जिंकले आहेत. आता इंग्लंडचा शेवटचा सामना उद्या (11 नोव्हेंबर) पाकिस्तानशी होणार आहे.
रवी शास्त्री होणार इंग्लंडचे प्रशिक्षक?
इंग्लंडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून पुनरागमन केले आहे आणि आता त्यांचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र ठरेल अशी अपेक्षा आहे. कारण त्यासाठी देखील इंग्लंडला पात्रता मिळवावी लागेल. पॉइंट टेबलमध्ये त्यांना टॉप-7 मध्ये राहावे लागेल. मात्र, इंग्लंडला आपल्या खेळात बरीच सुधारणा करण्याची गरज आहे. याच कारणामुळे, इंग्लंड-नेदरलँड सामन्यादरम्यान मैदानावर उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हातात एक पोस्टर धरले होते, ज्यावर लिहिले होते, "इंग्लंडला भारतीय प्रशिक्षकाची गरज आहे." मैदानावर उपस्थित कॅमेरामनने त्या चाहत्याचे पोस्टर टिपले, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा सुरू झाली.
त्यावेळी इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार इऑन मॉर्गन रवी शास्त्रीसह इंग्लिश कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. इयॉन मॉर्गनने चाहत्यांचे पोस्टर पाहिल्यानंतर रवी शास्त्रींना याविषयी त्यांचे मत विचारले तेव्हा रवी शास्त्री हिंदीत म्हणाले की, "हो, आम्हाला कॉल करा, आम्ही शिकवू, आम्ही हिंदी शिकवू, आणि आम्ही क्रिकेट देखील शिकवू." रवी शास्त्री यांनी इंग्रजी समालोचनात प्रथम हिंदीत हे सांगितले आणि नंतर त्याचे इंग्रजीत भाषांतर करून तेथे उपस्थित इयॉन मॉर्गनसह उपस्थितांना ते समजावून सांगितले.
आयसीसीने रवी शास्त्री यांच्या या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी आता व्हायरल होत आहे. आता या विश्वचषकात लज्जास्पद कामगिरीचा सामना केल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतीय प्रशिक्षकाची मदत घेतो की नाही हे पाहावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या