Pakistan vs Bangladesh match : पाकिस्तानने बांगलादेशला हरवून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तान पुन्हा गुणतालिकेत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ 7 सामन्यांत 3 विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपली प्रतिक्रिया दिली. आगामी सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाची रणनीती काय असेल? याबाबतही तो बोलला. 


तिन्ही विभागात कामगिरी चांगली झाली 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आमच्या खेळाडूंनी तिन्ही विभागात चमकदार खेळ केला, या विजयाचे श्रेय आमच्या खेळाडूंना जाते. आम्हाला माहित आहे की फखर जमानने 20-30 षटके खेळली तर तो एक वेगळा खेळ वाटू लागतो, फखर जमानने त्याचा नैसर्गिक खेळ केला. फखर जमानला पुन्हा एकदा फलंदाजी करताना पाहणे आनंददायी आहे. मात्र, आमचे लक्ष आगामी दोन सामन्यांवर आहे. आगामी दोन सामने खेळल्यानंतर आपण पॉइंट टेबलमध्ये कुठे आहोत ते पाहू, असेही तो म्हणाला. 


दरम्यान, दुखापतीतून सावरलेल्या फखर झमानने या सामन्यात पुनरागमन केले. त्यानेही संघाची गरज ओळखून खेळी करत दमदार अर्धशतक झळकावले. अब्दुल्लाह शफिकनेही स्पर्धेतील चौथे अर्धशतक झळकावले. त्यामुळे पाकिस्तानचा विजय सोपा झाला. शाहीन आफ्रिदीनेही चांगली गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. 






मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो 


बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आम्ही सामन्याला शानदार सुरुवात केली. विशेषतः शाहीन आफ्रिदीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी 15-20 षटकांनंतर चांगली भागीदारी केली. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले, विशेषतः आमच्या आघाडीच्या गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेतल्या. आमच्या संघाला चाहत्यांचा खूप पाठिंबा मिळाला, असेही तो म्हणाला. याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.






काय म्हणाला बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन?


शाकिब अल हसन म्हणाला की ही विकेट फलंदाजीसाठी चांगली होती, पण आम्ही चांगली धावा करू शकलो नाही, आमचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. मात्र, आमच्या फलंदाजांनी काही भागीदारी केल्या, पण मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. आम्ही फलंदाजीत खराब कामगिरी केली, पण श्रेय पाकिस्तानला जाते. नेत्रदीपक गोलंदाजी सादर केली. पाकिस्तानी गोलंदाजांनंतर फलंदाजांनी पहिल्या 10 षटकांमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते आश्चर्यकारक होते. आम्ही आणखी 2 सामने खेळू, आशा आहे की आम्ही चांगली कामगिरी करू. आमच्या संघाला सर्वत्र चाहत्यांचा पाठिंबा मिळाला, आम्ही शेवटचे दोन सामने जिंकून चाहत्यांना हसण्याची संधी देऊ.


इतर महत्वाच्या बातम्या