Pakistan Cricket Team : वर्ल्डकपमधील 66 टक्के खेळ खल्लास झाल्याने स्पर्धा रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा पराभव केल्याने पुन्हा एकदा सेमीफायनलची रंगत वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे आज (2 नोव्हेंबर) श्रीलंका पराभूत होण्यासाठी पाकिस्तान वाट पाहत आहे. ही स्थिती असतानाच पाकिस्तान टीमने एका बाबतीत मात्र पाकिस्तानच्या टाॅप दोन टीम मागत प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे.


कॅचमध्ये पाकिस्तानची बाजी 


कॅचेस विन मॅचेस असे क्रिकेटमध्ये नेहमी म्हटले जाते. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने कॅच घेण्यात बाजी मारली आहे. (Pakistan at the top in catch efficiency in World Cup 2023) पाकिस्तानची वर्ल्डकपमध्ये 86 टक्के catch efficiency राहिली आहे. याबाबतीत त्यांनी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला पछाडलं आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या नेदरलँडची catch efficiency आहे. त्यांनी 85 टक्के कॅचेस घेतले आहेत. टीम इंडिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका 81 टक्क्यांसह अनुक्रमे तीन, चार, पाच क्रमांकावर आहेत. 






चढ-उतारानंतरही पाकिस्तानच्या आशा जिवंत 


दुसरीकडे, चढ-उतारानंतरही पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत. गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अंतिम चारमध्ये पोहोचण्याची 10 टक्के शक्यता आहे.


दुसरीकडे, टीम इंडिया सर्व 6 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून सेमीफायनलचे तिकीट नक्की करेल, अशी आशा आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता 99 टक्के आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरी गाठण्याची 98 टक्के शक्यता आहे. त्यांनी  6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्याचा नेट रन रेट अप्रतिम आहे. उरलेल्या तीन सामन्यांत किमान एक सामना जिंकला तर उपांत्य फेरी गाठणार हे निश्चित आहे. तिन्ही सामने गमावले तरी अंतिम 4 मध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा कायम राहतील.


अफगाणिस्तानने धक्कादायक कामगिरी केली आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार बनला आहे. अफगाणिस्तान संघाने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. उरलेल्या 3 पैकी दोन सामने जिंकले तर निव्वळ धावगतीच्या आधारावर शेवटच्या 4 सामन्यात पोहोचण्याची आशा आहे. तिने तिन्ही सामने जिंकले तर ती निश्चितपणे उपांत्य फेरी गाठू शकते. अफगाण संघाची अंतिम 4 मध्ये जाण्याची शक्यता 15 टक्के आहे.


इतर महत्वाच्या बातम्या