ICC Cricket World Cup 2023 England vs New Zealand : अहमदाबादमधील कडक उन्हामध्ये आज क्रिकेट वर्ल्ड कपचा प्रारंभ झाला. विश्वविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिलीच लढत होत आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडच्या एकही फलंदाजाला तग धरता आला नाही. इंग्लंडकडून शेवटच्या विकेटसाठी झालेल्या 30 धावांच्या भागीदारीमुळे 282 धावांपर्यंत मजल मारता आली. 


न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज अडखळले


पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडची दमदार गोलंदाजी दिसून आली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज लाॅकी फर्ग्युसन आणि टीम साऊथी नसतानाही इंग्लंडला रोखले. त्यामुळे न्यूझीलंडला रोखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर असेल. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत इंग्लंडला रोखून धरले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज अडखळताना दिसून आले.


मॅट हेन्रीने 10 षटकात 48 धावा तीन विकेट घेतल्या. मिशेल सँटनरने 10 षटकात 37 धावा देत दोन विकेट घेतल्या. ग्लेन फिलीप्सने 3 षटकात 17 धावा देत 2 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने एक बळी घेतला. रचिन रवींद्र मात्र सर्वात महागडा गोलंदाज ठरला. 10 षटकामध्ये 76 धावा देताना त्याला अवघा एक बळी घेता आला.  तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ज्यो रुटने केलेल्या 86 चेंडूतील 77 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या धावसंख्येला आकार आला. त्याला कर्णधार जोस बटलरने चांगली साथ देत 43 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या कुठल्याच फलंदाजाला लय पकडता आली नाही. 


इंग्लंडची सुरुवात गावाची सुरुवात जॉनी बेअरस्टाॅ आणि डेव्हिड मालनने केली. मात्र, मालनला मिळालेल्या जीवनाचा फायदा उचलता आला नाही. तो अवघ्या 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेअरस्टाॅ सुद्धा 36 धावांवर बाद झाला. त्यामुळे दोन्ही सलामीवर तंबूत परतल्यानंतर ब्रूकही 25 धावांवर  परतला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 84 झाली होती. त्यानंतर आलेला मोईन अलीही स्वस्तात 11 धावांवर बाद झाला. यानंतर पाचव्या विकेटसाठी बटलर  आणि च्यो रूट यांनी केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या डाव संख्येला आकार आला. 


30 धावांच्या अंतिम विकेटच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे इंग्लंडने चांगली धावसंख्या गाठली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सर्व एकदिवसीय सामने उच्च-स्कोअरिंगचे नाहीत. त्यामुळे ही नक्कीच आव्हानात्मक खेळपट्टी आहे. इंग्लंडकूडनही टिच्चून मारा केल्यास शेवटच्या 30 धावा निर्णायक होऊ शकतात. 


इतर महत्वाच्या बातम्या