लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करुन घरचा रस्ता दाखवला. भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहता सर्वांना असे वाटले होते की, भारत सहज अंतिम सामन्यात पोहोचेल, विश्वचषक जिंकेल. त्यामुळे इंग्लंडसह जगभरातील हजारो भारतीयांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तिकीटं अगोदरच खरेदी केली होती. परंतु भारत आता अंतिम सामना खेळणार नसल्यामुळे भारतीयांना या सामन्याबाबत कोणतीही उत्सुकता राहिलेली नाही.


भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात अंतिम सामन्याच्या तिकिटांचं बुकिंग करुन ठेवलं होतं. परंतु आता भारतीयांना या सामन्यात कोणताही इंटरेस्ट नसल्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम याने भारतीय चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. निशमने भारतीय चाहत्यांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला अंतिम सामना पाहायचा नसेल तर, तुम्ही सामन्याची तिकीटं विका. त्यामुळे आमच्या आणि इंग्लंडच्या जास्तीत जास्त चाहत्यांना सामना पाहायला मिळेल.


निशमने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये निशमने भारतीय चाहत्यांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला फायनल मॅच पाहायची नसेल तर, तुम्ही सामन्याची तिकीटं अधिकृत वेबसाईटवर विका. त्यामुळे ज्यांना हा सामना पाहायचा आहे, त्या लोकांना या सामन्याची तिकीटं मिळतील. प्रॉफिट कमावण्याची एक संधी तुमच्याकडे आहे.

VIDEO | टीम इंडियामध्ये कोहली आणि रोहितचे दोन गट? शास्त्रींच्या कारभारामुळे असंतोषाची चर्चा | ABP Majha