सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मगरी पात्राबाहेर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हरिपूर मधील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर 4-5 मगरी बाहेर आल्याचं दिसून आलं आहे.
सांगलीतील आयुष हेल्पलाईन टीम नदीत दोन दिवसांपूर्वी उडी मारलेल्या एका तरुणीचा शोध घेत होती. यादरम्यान आयुष हेल्पलाईन टीमला या मगरीचं दर्शन झालं. भल्यामोठ्या महाकाय मगरी पाहून आयुष टीमने या कृष्णा-वारणा नद्यांच्या संगम परिसरातील सर्च ऑपरेशन थांबवले आहे. या घटनेमुळे मात्र कृष्णा नदीकाठी पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
कृष्णा नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय पाण्याचा प्रवाह देखील जास्त आहे. यामुळे कृष्णा नदी काठावर आणि नदी काठच्या शेतात मगरीचे वास्तव वाढले आहे. त्यामुळे नदी काठच्या शेतात जाताना नागरिक काळजी घेत आहेत. अशा स्थितीत महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने नदी काठी वावरणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
पूर परिस्थितीत कोणी मगरीचा बळी ठरु नये, यासाठी नदी काठी वन विभागाने आपले कर्मचारी तैनात केले आहेत. हे कर्मचारी त्या भागातील मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच नदी काठी येणाऱ्या लोकांना नदीजवळ न जाण्याचं आवाहन करत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच पद्माले गावाजवळील कृष्णा नदी पात्रतून मगरीने एका मुलाला ओढून नेले होते.
सांगलीत कृष्णा नदीकाठी महाकाय मगरी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2019 04:43 PM (IST)
कृष्णा नदीच्या पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय पाण्याचा प्रवाह देखील जास्त आहे. यामुळे कृष्णा नदी काठावर आणि नदी काठच्या शेतात मगरीचे वास्तव वाढले आहे. त्यामुळे नदी काठच्या शेतात जाताना नागरिक काळजी घेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -