India vs Wales Hockey World Cup 2023 Live Streaming : भारतीय हॉकी संघ (Team India) आज हॉकी विश्वचषकातील (Hockey World Cup 2023) आपला दुसरा सामना खेळणार आहे. भारताने सलामीचा सामना स्पेन संघाविरुद्ध (India vs Spain) 2-0 ने जिंकल्यावर आज इंग्लंडविरुद्ध (India vs England) मैदानात उतरणार आहे. इंग्लंडने सलामीच्या सामन्यात वेल्स संघावर 5-0 असा विजय मिळवल्याने भारताला आजचं इंग्लंडचं आव्हान काहीसं कठीण असणार हे नक्की. दरम्यान यंदा ही विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जात असल्याने भारत स्पर्धा जिंकेल अशी आशा फॅन्सना आहे. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात भारत कसं प्रदर्शन करतो हे पाहावं लागेल दरम्यान त्यापूर्वी आजच्या सामन्यासंबधी माहिती जाणून घेऊ...


कधी होणार सामना?


भारत विरुद्ध इंग्लंड हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना आज अर्थात 15 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. 


कुठे आहे सामना?


आजचा भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  


कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ : अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.


इंग्लंड संघ: एम्स डेव्हिड, अल्बेरी जेम्स, अँसेल लियाम, बंडुरॅक निक, कॅलनन विल, कॉन्डोन डेव्हिड, गुडफिल्ड डेव्हिड, मार्टिन हॅरी, माझारेलो जेम्स, पार्क निक, पायने ऑली, रोपर फिल, रश्मेरे स्टुअर्ट, सॅनफोर्ड लियाम, सोर्सबी टॉम, वॉलेस झॅक, वॉलर जॅक , वॉर्ड सॅम, क्रीड ब्रेंडन, स्लोन इयान


हे देखील वाचा