Sambhaji Chhatrapat: सर्च इंजिन गूगलनं (Google) कुस्तीगीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त खास डूडल तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून गूगलनं खाशाबा जाधव यांना अभिवादन केलं आहे. आता खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलद्वारे अभिवादन केले आहे. पण त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे, अशी पोस्ट संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapat) यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून "पद्म" पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.'
संभाजीराजे छत्रपती राज्यसभा खासदार असताना त्यांनी 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर "पद्मविभूषण" मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता मात्र शेवटी त्यांची उपेक्षाच झाली, ही भावनाही त्यांनी आपल्या पोस्ट मधून मांडली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट
आता तरी सरकारने जागे व्हावे, असे म्हणत या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना "पद्म" पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ऑलिम्पिकच्या दुनियेत ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, त्या खाशाबा जाधवांना पद्मश्री पुरस्कार मिळत नसल्याची खंत रणजित जाधव यांनी व्यक्त केली होती. सरकारने दखल न घेतल्याने रणजित जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. गूगलच्या या डूडलमध्ये कुस्तीचा आखाडा दिसत आहे. तसेच खाशाबा जाधव यांचे चित्र देखील या डूडलमध्ये दिसत आहे. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Khashaba Dadasaheb : कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती; गूगलचं खास डूडल