IND vs ENG, Hockey WC 2023 : आज (15 जानेवारी) भारतीय संघ हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) मध्ये इंग्लंड संघाचा सामना करणार (IND vs ENG) आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता दोन्ही संघ एकमेंकाशी भिडणार आहे. दरम्यान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकतर्फी पद्धतीने जिंकला होता, त्यामुळे या सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की! भारत आणि इंग्लंड हॉकी संघाचे यापूर्वीचे सामनेही अतिशय रोमहर्षक झाले आहेत. गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने झाले होते. यामध्ये दोन सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना भारताने जिंकला.
या दोन्ही संघांमधला शेवटचा सामना 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झाला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. भारतीय संघाने येथे 3-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत सामना 4-4 असा बरोबरीत सोडवला. दोन्ही संघ यावेळी त्यांच्या मागील सामन्यातून बरच काही शिकून मैदानात उतरतील. आज भारत असणाऱ्या गटातील वेल्स आणि स्पेनही एकमेंकाशी भिडणार आहेत.
सामना जिंकणाऱ्याचं उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट जवळपास निश्चित
या विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आहेत. यात चार गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये चार संघ आहेत. प्रत्येक गटामधील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवेल, तर पूलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांना क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे अंतिम-आठमध्ये स्थान मिळू शकेल. अशा परिस्थितीत पूलमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. आजच्या सामन्यातील विजेत्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळण्याची अधिक संधी असेल.
भारत वि. इंग्लंड Head to Head
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 7 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
हे देखील वाचा-