Hockey FIH Pro League Belgium vs India : एफआईएच प्रो लीगमधील सामन्यात भारताच्या पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑलम्पिक विजेत्या बेल्जिमला भारताच्या संघाने पराभवूत केलेय. रोमांचक सामन्यात शूटआऊटमध्ये भारतीय संघाने बेल्जिअमचा 5-4 च्या फरकाने पराभव केला. हरमनप्रीत सिंह, जर्मनप्रीत सिंह आणि शमशेर सिंह यांचा भारताच्या विजयात सिंहाचा वाटा होता. या तिघांनी मोख्याच्या क्षणी तीन गोल केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर शुटआऊटमध्ये भारतीय संघाने बाजी मारली.  


एफआईएच प्रो लीगमधील सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. शमशेर सिंह याने 17 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. हा आनंद थोड्यावेळासाठी राहिला. कारण बेल्जिअमने जोरदार प्रतिउत्तर देत 20 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. ब्लेजिअमकडून चार्लर केड्रिक याने पहिला गोल केला. बेल्जिअमने ही आघाडी कायम ठेवत 35 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. त्यानंतर 50 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सामन्यात बढत मिळवली. सामना संपण्याच्या काही काळ आधी बेल्जिअम 3-1 च्या फरकाने आघाडीवर होता. 






 3-1 ने आघाडीवर असणारा बेल्जिअमचा संघा विजय मिळवणार असे वाटत होती. पण भारतीय संघाने जोरदार प्रतिउत्तर दिले. 51 व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत सिंह याने गोल करत सामन्यात रंगत वाढवली... त्यानंतर मोक्याच्या क्षणी 57 व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंह याने गोल करत सामन्यात बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही, अन् सामना बरोबरीत सुटला.






पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने अखेरच्या काही मिनिटांत सांघिक खेळ केला. हरमनप्रीत सिंह, जर्मनप्रीत सिंह यांनी अखेरच्या दहा मिनिटात दोन गोल केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना शूटआऊटमध्ये गेला. ऑलम्पिक विजेत्या बेल्जिअमचा आत्मविश्वास वाढलेला होता, पण भारतीय संघाने शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बाजी मारली.