Khelo India Youth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियानाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. पहिल्या सेटपासूनच दिया आणि स्वस्तिका आक्रमक खेळ करीत होते. त्यांचे फोरहॅड टॉपस्पिन फटके खेळताना हरियानाच्या खेळाडूंची त्रेधा उडाली. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्र १४ तर हरियाना १२वर होता. दुसरा सेट दिया आणि स्वस्तिकाने ११-०९ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये हरियानाच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामन्यात काही काळ रंगत वाढली. सुरूवातीचे चार गुण घेत हरियानाने आघाडी घेतली. परंतु दिया आणि स्वस्तिकाने त्यांचे संरक्षण भेदून काढले. आणि तिसरा सेट ११-०६ असा जिंकला. दियाची जर्मनीत प्रॅक्टीस, कॉमनवेल्थसाठी निवडदियाची कॉमनवेल्थ गेमसाठी निवड झाली आहे. तिला जर्मनीचे प्रशिक्षक आहेत. वर्षातून काही महिने ती जर्मनीत सराव करते. दिया आणि स्वस्तिका या गेल्या सात वर्षांपासून एकत्र सराव करतात. त्यामुळे दोघींमध्ये चांगला ताळमेळ आहे. दोघीही आक्रमक आहेत. त्यांचा संरक्षणावर कमी भर असतो. फोरहँड टॉप स्पीन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
लॉन टेनिसमध्ये दुहेरीत रौप्यपदकलॉन टेनिसमध्ये वैष्णवी आडकर आणि सुदिप्ता कुमार यांच्या संघाला रौप्यपदक मिळाले. त्यांना तामीळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आमि जननी रमेश यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट (७-५) महाराष्ट्राने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा सेट कर्नाटकच्या खेळाडूंनी ६-२ असा जिंकला. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला. यात कर्नाटकच्या लक्ष्मीप्रभा व जननी रमेशने आक्रमक सुरूवात केली. त्यांचे सात गुण होईपर्यंच महाराष्ट्र ० गुणावर होता. नंतर दोघींनी आक्रमण सुरू केले, त्यामुळे स्कोर ५-९वर गेला. मात्र, कर्नाटकने एक गुण घेत सामन्यासह सुवर्णपदक जिंकले.
सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्येरोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियानासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियानाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील. या सामन्यात आपले रौप्यपदक पक्के झाले आहे.