IND vs PAK: T20 विश्वचषकाच टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना रोमांचक पद्धतीनं 4 गडी राखून जिंकला होता. या विजयात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा हात होता. कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 19व्या षटकात वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले. त्या षटकारांमुळे सामना भारताच्या बाजूने आला. यावेळी मैदानात असलेला हार्दिक पांड्या हे षटकार पाहून चकित झाला. विराटच्या या दोन षटकारांबद्दल हार्दिक पांड्या म्हणाला की, ते षटकार फक्त विराटच मारू शकतो.


भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची गरज होती. विराट कोहलीने 19 वे षटक टाकणारा वेगवान गोलंदाज हरिस रौफला दोन षटकार मारून धावसंख्या आवाक्यात आणली. त्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या.


असे फटके कोहलीशिवाय कोणीही खेळू शकत नाही
हार्दिक म्हणाला की, “मी खूप षटकार मारले आहेत. पण विराटने मारलेले ते दोघे माझ्यासाठी खास आणि खूप खास आहेत, कारण ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मी खूप क्रिकेट खेळलो आहे. पण मला वाटत नाही की कोहलीशिवाय इतर कुणीही ते दोन शॉट खेळू शकेल."


हार्दिक म्हणाला, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र खेळलो. आम्ही जाऊन वेगवान फलंदाजी केली असती तर ते विशेष झाले नसते. त्याने अविश्वसनीय शॉट्स खेळले. 


मोठ्या सामन्यांमध्ये दबाव असतो


हार्दिक पुढे म्हणाला, यावेळी संघावर निश्चितच दबाव होता.  मोठ्या सामन्यांमध्ये अनेकांना दडपण जाणवते आणि ते किती असते हे खेळाडूंनाच माहीत असते. आम्ही एक संघ म्हणून खूप मेहनत केली. हार्दिक पुढे म्हणाला, मी सुन्न झालो होतो. मैदानावर आलो तेव्हा खूप आनंद झाला. मी राहुल द्रविड यांच्याशी बोलत होतो. त्यांनी मला सांगितले, तू खूप चांगली कामगिरी केली आहे. 


टी-20 विश्वचषकातील महामुकाबल्यात काल भारतानं पाकिस्तानचा (India vs Pakistan) चार विकेट्स राखून पराभव केला. या रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सोबत घेऊन भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला होता.


ही बातमी देखील वाचा- IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यातील जबरदस्त थ्रिलर पाहून चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू