बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असे गौरवोद्गार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काढले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी एबीपी माझाने दिवाळीनिमित्त दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी राजकारणातले रॉकेट आणि शंकरपाळे कोण याबाबत दिलखूलास चर्चा केली. 


सुषमा अंधारे म्हणाल्या, "शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली.  यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवाचाबद्दलही सांगितले. संघर्षाबद्दल सांगताना त्यांच्या आईला देखील अश्रू आणावर झाले.  


यामध्ये राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह अन्य फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची तुलना अनेक राजकारण्यांशी सुषमा अंधारे यांनी केली.  शरद पवार हे मेथीच्या लाडू सारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत. ते स्टेट फॉरवर्ड असतात. शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. मात्र गोड पदार्थ हे हानिकारक असतात असं म्हणत धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली म्हणून केला.


सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला. यावेळी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल सांगताना त्यांच्या आईला देखील अश्रू आणावर झाले. सुषमा अंधारे या आपल्या कामानिमित्त पुण्यात राहतात. मात्र सणासुदीमध्ये एक ते दोन दिवस त्या परळीला येत असतात. एवढाच वेळ त्या आपल्या कुटुंबासोबत घालवतात. हे सांगताना त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. 


दिवाळीच्या फराळाच्या नेत्यांना उपमा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी नेत्यांना फटाक्यांच्या उपमा देऊन देखील आपल्या शब्दातून चांगलीच आतिषबाजी  केली. राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचं त्या म्हणाल्या. फटाक्याची लढ म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली. तर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कावळा ब्रँडच्या फटाक्यांची उपमा सुषमा अंधारे यांनी दिली.