हरभजनची मुलगी हिनाया आणि सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया एकमेकींशी बोलण्यात गुंतल्या आहेत. हरभजनची पत्नी, अभिनेत्री गीता बसराने दोघींचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'वाघाचे बछडे पुढच्या सामन्याची रणनीती आखत आहेत' असं कॅप्शन गीताने दिलं आहे.
सोशल मीडियावर या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. धोनीची मुलगी झिवा कुठे आहे? असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. हरभजन सिंग, सुरेश रैना यांनीही हा फोटो रिपोस्ट केला आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या अकराव्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आहे. रैनासोबत यंदा भज्जही चेन्नई संघात आहे. गेली दहा वर्ष हरभजन मुंबई इंडियन्ससोबत खेळत होता, मात्र यावेळी त्याला चेन्नईने संघात घेतलं.