Nitu Ganghas Won Gold Medal: भारताची महिला बॉक्सिर नीतू घणघसनं (Nitu Ganghas) महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा (England's Demie-Jade Resztan) 5-0 असा पराभव केलाय.


नीतू घणघसची दमदार कामगिरी
भारतीय महिला बॉक्सर नीतू घणघसनं कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. आजचा दिवस नीतूसाठी खास ठरलाय. आज संध्याकाळी सात वाजता आणि रात्री एक वाजता आणखी दोन भारतीय बॉक्सरचा अंतिम सामना होणार आहे. ज्यात भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे. 


बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
भारताची स्टार बॉक्सर निकहत झरीनं भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याच्या उद्देशानं रिंगणात उतरेल. तर, हेवीवेटच्या फायनल सामन्यात सागर अहलावत नशीब आजमवणार आहे. भारतीय वेळेनुसार, निकहतचा सामना सध्याकाळी सात वाजता सुरू होईल. तर, रात्री एक वाजता सागर अहलावतचा सामना पाहायला मिळेल. 


भारतानं आतापर्यंत किती पदकं जिंकली?
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 43 पदक जिंकली आहेत. ज्यात 15 सुवर्णपदक, 11 रौप्यपदक आणि 17 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे. 


भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू


सुवर्णपदक- 15
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू घणघस, अमित पंघाल.


रौप्यपदक- 11
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ.


कांस्यपदक- 17
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ.


हे देखील वाचा-