Birmingham 2022 Commonwealth Games Day 10: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे. आज एकूण 45 सुवर्णपदकांबाबत निर्णय होईल. भारताला आज क्रिकेट, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचं नाव मोठं करण्याची संधी आहे. बॉक्सिंगमध्ये निखत झरीन नीतू आणि अमित सुवर्णपदकासाठी पंच करतील. टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल त्याच्या जोडीदारांसह अंतिम फेरीत असतील. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताच्या आजच्या वेळपत्रकावर एक नजर टाकुयात.
भारतीय महिला हॉकी संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड (कांस्यपदक सामना) दुपारी 1.30 वा.
बॅडमिंटन
पीव्ही सिंधू (महिला एकेरी उपांत्य फेरी) दुपारी 2.20 मि.
लक्ष्य सेन (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी 3.30 मि.
किदंबी श्रीकांत (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी 3.10 मि.
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद (महिला दुहेरी उपांत्य फेरी) दुपारी 4.00 वा.
ऍथलेटिक्स
अब्दुल्ला, अल्डोस पॉल, प्रवीण चित्रवाल (पुरुष ट्रिपल जंप अंतिम सामना) दुपारी 2.45 मि.
अमित, संदीप कुमार (पुरुष 10,000 मीटर रेस वॉक) दुपारी 3.50 मि.
अनु राणी, शिल्पा राणी (महिला भालाफेक अंतिम सामना) दुपारी 4.05 मि.
डीपी मनू, रोहित यादव (पुरुष भालाफेक अंतिम) दुपारी 12.10 मि.
बॉक्सिंग
नीतू (महिला 45-48 किलो गट अंतिम सामना) दुपारी 3 वा.
अमित पंघाल (पुरुष 48-51 किलो गट अंतिम सामना) दुपारी 3.15 मि.
निखत झरीन (महिला 48- 51 किलो गट अंतिम सामना) संध्याकाळी 7 वा.
सागर ( पुरूष 82 किलो+ वटन गट अंतिम सामना) दुपारी 1.15 वा.
टेबल टेनिस
श्रीजा अकुला (महिला एकेरी कांस्यपदक सामना) दुपारी 3.35 मि.
अचंता शरथ कमल आणि गणनासेकरन साथियां (पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना) संध्याकाळी 6.15 मि.
अचंता शरथ कमल (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) रात्री 9.50 मि.
अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (मिश्र दुहेरी सुवर्णपदक सामना) दुपारी 12. 15 मि.
क्रिकेट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला क्रिकेट सुवर्णपदक सामना) रात्री 9.30 मिं.
स्क्वॅश
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल (मिश्र दुहेरी कांस्यपदक सामना) रात्री 10.30 मि.