रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळविण्यासाठी 74 किलो वजनी गटातील सुशील आणि नरसिंहमध्ये मोठी कायदेशीर लढाईही झाली. ज्यामध्ये नरसिंहने कोटा स्थान पटकावलं होतं. त्यामुळे नरसिंहचं ऑलिम्पिक तिकीट पक्कं झालं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी सापडल्यानं या प्रकरणाला नवं वळणं मिळालं होतं. यानंतर त्याच्यावर तात्पुरती बंदीही घालण्यात आली होती. मात्र, आज नाडानं नरसिंहला बंदी हटवून मोठा दिलासा दिला.
नरसिंहला दिलासा मिळाल्यानंतर पैलवान सुशीलकुमारनं सोशल मीडियावरुन त्याला आपलं समर्थन दर्शवलं आहे. 'खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझंही आधीही समर्थन होतं. आजही आहे आणि उद्याही राहिल. ज्या माझ्यासाठी आणि देशासाठी पदक जिंकून ये.' असं त्यानं ट्विट केलं.
'कुस्तीला या सर्व प्रकरणातून जावं लागलं हे फारच दुर्दैवी आहे. यासाठी मी माझं आयुष्य वेचलं आणि मी कायमच माझ्या सोबतीच्या पैलवानांच्या पाठीशी राहिलो आहे.' असंही ट्वीट सुशीलकुमारनं केलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नरसिंह यादव निर्दोष सिद्ध झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे.
त्यांनीही नाडाच्या या निर्णयाचं स्वागतं केलं आहे.