मुंबई : वरुणराजानं मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव आता काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.


 
विहार आणि तुळशी हे तलाव ओव्हरफ्लो झाले असून इतर तलावक्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.

 

मुंबईकरांची वर्षभराची तहान 14 दशलक्ष लीटर पाण्याने भागते. सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबईच्या तलावांमध्ये 10 दशलक्ष लीटर पाण्याचा साठा झाला आहे. येत्या काही दिवसात आणखी पाण्याचासाठा वाढण्याची अपेक्षा आहे. पुढच्या वर्षापर्यंत मुंबईकरांवरचं पाण्याचं टेन्शन आता लवकरच दूर होईल, असं म्हणायला हरकत नाही.