S. Sreesanth on Gautam Gambhir : सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या दिग्गजांमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) खेळले जात आहे. या स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रीशांत गुजरातकडून गोलंदाजी करत होता आणि गौतम गंभीर इंडिया कॅपिटल्सकडून फलंदाजी करत होता. गौतम गंभीरने श्रीशांतच्या काही चेंडूंवर शानदार षटकार आणि चौकार मारले आणि त्यानंतर त्यांच्या काळातील या दोन आक्रमक क्रिकेटपटूंमध्ये वाद निर्माण झाला.


श्रीशांतचा गंभीरवर आरोप 


या दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये बराच वाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. दरम्यान, गुरुवारी सकाळी श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक लाइव्ह व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने सामन्यादरम्यान गौतम गंभीरसोबत झालेल्या भांडणाबद्दल सांगितले. श्रीशांतने सांगितले की, गंभीरने खेळपट्टीवर फलंदाजी करताना वारंवार त्याला शिवीगाळ केली, त्याच्याबद्दल अपशब्द वापरले आणि त्याला फिक्सर म्हणत त्याचा अपमान केला.






तु सर्वोच्च न्यायालयाच्या वर आहेस का? 


तू खेळाडू आणि भाऊ म्हणून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेस. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तु लोकांचं प्रतिनिधित्व करतोस. तरीही, तू प्रत्येक क्रिकेटपटूशी वाद घालत राहतोस. तुझी अडचण आहे तरी काय? मी फक्त हसलो आणि निरीक्षण केलं आणि तु मला फिक्सर म्हणून लेबल लावलास? गंभीरपणे? तु सर्वोच्च न्यायालयाच्या वर आहेस का? तुला अशा पद्धतीने बोलण्याचा आणि तुला वाटेल ते बोलण्याचा अधिकार नाही. तू पंचांना शाब्दिक शिवीगाळ केलीस आणि तरीही तु हसत बोलतोस? तु एक गर्विष्ठ आणि पूर्णपणे लायकी नसलेला व्यक्ती आहेस. ज्यांनी तुला पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर नाही. 






कालपर्यंत, मी नेहमीच तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा आदर करत असे. तथापि, तु "फिक्सर" हा अपमानास्पद शब्द फक्त एकदाच नाही तर सात किंवा आठ वेळा वापरलास. तु पंच आणि माझ्यासाठी एफ-शब्द वापरून मला चिथावणी देण्याचा प्रयत्न केलास मी जे सहन केले. ते ज्यानं अनुभवलं आहे तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही. खोलवर, तुला माहिती आहे की तू जे बोललास आणि केले ते चुकीचे होतं. मला खात्री आहे देव देखील तुम्हाला माफ करणार नाही. त्यानंतर तू मैदानातही आला नाहीस. चला, देव सर्व पाहत आहे.


तत्पूर्वी, श्रीशांतने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "प्रत्येक चॅनलवर जाऊन पुन्हा पुन्हा सांगण्याऐवजी, मी थेट येऊन सर्व काही एकाच वेळी स्पष्ट करणे चांगले आहे. अर्थात तो (गौतम गंभीर) जिथून आला आहे, त्याच्याकडे एक उत्कृष्ट पीआर टीम आहे, ज्यावर खूप पैसे खर्च करतात. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्याने माझी लढाई एकटाच लढू शकतो."


इतर महत्वाच्या बातम्या