Budh Vakri 2023 December: ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि वाणीचा दाता आहे. जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो किंवा त्याच्या हालचाली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या करिअरवर, आर्थिक स्थितीवर होतो.


हे 15 दिवस कठीण काळाचे


डिसेंबर महिन्यात बुध ग्रहाच्या स्थितीत दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. बुध 13 डिसेंबरला दुपारी 12:01 वाजता धनु राशीत उलटी चाल चालेल. 28 डिसेंबरपर्यंत बुध तिथेच राहील आणि त्यानंतर तो आपली राशी बदलेल. या काळात बुध काही राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करेल. बुधाच्या उलट्या चालीमुळे काही लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या काळात कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना त्रास होईल? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


13 ते 28 डिसेंबरचा काळ मेष राशीसाठी सतर्कतेचा असणार आहे. प्रतिगामी बुध मेष राशीच्या लोकांना हानी पोहोचवू शकतो. या लोकांना भाषणाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. तुम्ही कोणाशी तरी कडवट बोलू शकता किंवा तुमच्या म्हणण्याचा कोणी चुकीचा अर्थ लावू शकतो, त्यामुळे तुमचा वाद होऊ शकतो. नात्यात चढ-उतार येऊ शकतात. काही जुने आजार उद्भवू शकतात. प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक नुकसानही होऊ शकतं. 


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना बुधाच्या उलट्या चालीमुळे काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषत: विवाहित लोकांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सासरच्यांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. या 15 दिवसांच्या काळात विचारपूर्वक बोला, अन्यथा कोणाचा गैरसमज होऊ शकतो. खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. वडिलांच्या तब्येतीची चिंता राहील.


कर्क रास (Cancer)


बुधाची उलटी चाल कर्क राशीच्या लोकांना त्रास देईल. आजारपणामुळे त्रास होईल. शत्रूही सक्रिय राहतील, तुमच्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील. अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य कमी होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही करत असलेलं काम बिघडू शकतं. भावा-बहिणीशी संबंध बिघडू शकतात. कायदेशीर अडचणींपासून दूर राहा, तसेच प्रवास करताना काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव