Shubman Gill : टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्यातील लपूनछपून भेटीची  चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र, आजतागायत दोघांनीही समोर येऊन आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मात्र, शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरसोबत लंडन दौऱ्यावर आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. गिल अवनीतसोबत दिसल्याने शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणत आहेत. पण खरंच शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरला डेट करत आहे का? या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? याचीही चर्चा रंगली आहे. 






सोशल मीडियावर फोटो व्हायरल


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अवनीत कौर आणि शुभमन गिल लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मात्र, या फोटोत इतर मित्रही आहेत, याचा अर्थ हा ग्रुप फोटो आहे. शुभमन गिल ब्राऊन लाँग ब्लेझरमध्ये दिसत आहे, तर अवनीत कौर ब्लॅक लूकमध्ये आहे. शुभमन गिल आणि अवनीत कौर रिलेशनशिपमध्ये नाहीत, पण दोघांना एकत्र दिसण्यामागे आणखी काही कारणं आहेत. दोघेही एकत्र म्युझिक व्हिडिओ करताना दिसतील. म्हणजेच क्रिकेटशिवाय शुभमन गिल म्युझिक व्हिडिओमध्ये काम करू शकतो.






शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये आहेत का?


शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सतत समोर येत असतात, मात्र आजतागायत दोघांनीही समोर येऊन आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. म्हणजेच या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र, याआधी विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांदरम्यान सारा स्टेडियममध्ये दिसली होती, त्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर सतत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता शुभमन गिल आणि अवनीत कौरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या