Indian Cricketers Who have acted in Movie :  अभिनेता म्हणून अपयशी ठरले असले तरी, त्यांनी पडद्यावर कोणतीही भूमिका साकारली तरी चाहत्यांना नक्कीच नाचण्याची संधी दिली. भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेट सोडल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. अशा परिस्थितीत जाणून घेऊया अशा क्रिकेटपटूंबद्दल ज्यांनी क्रिकेटर असण्यासोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.


भारताचा महान अष्टपैलू कपिल देव यांनीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1983 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कपिल देव यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये कॅमिओ काम केले आहे. 2006 मध्ये नागेश कुकुनूरच्या 'इकबाल' चित्रपटात कपिल एका कॅमिओमध्ये दिसला होते. क्लायमॅक्समध्ये त्यांनी इक्बालला त्याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल माहिती देणाऱ्या निवडकर्त्याची भूमिका बजावली. याशिवाय कपिल 2004 साली आलेल्या सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही दिसले होते. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात हरभजन सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ आणि नवज्योत सिंग सिद्धू या क्रिकेटपटूंनीही काम केले होते. शिखर धवन सुद्धा चित्रपटांमध्ये दिसून आला आहे.


संदीप पाटील


माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील हे उत्कृष्ट क्रिकेटपटू असून त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 1985 मध्ये आलेल्या 'कभी अजनबी' या रोमँटिक चित्रपटात संदीप पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि पूनम धिल्लनने या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री म्हणून काम केले होते. 


एस. बद्रीनाथ  


आश्वासक सुरुवात असूनही, बद्रीनाथची क्रिकेट कारकीर्द केवळ तीन वर्षे टिकली. बद्रीनाथ कधीही टीम इंडियासाठी सतत खेळू शकला नाही. बद्रीनाथ भारतासाठी फक्त 10 सामने खेळू शकला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बद्रीनाथने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. बद्रीनाथने अलीकडेच थलपथी विजयच्या 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या दुहेरी भूमिकेतील चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.


अजय जडेजा


भारताचा दिग्गज फलंदाज अजय जडेजानेही क्रिकेट सोडल्यानंतर चित्रपटांमध्ये काम केले. 2003 मध्ये, अजय जडेजाने सुनील शेट्टी आणि सनी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या खेल (2003) चित्रपटात काम केले. अजय जडेजा अभिनेता म्हणून फ्लॉप ठरला होता. अजय जडेजाने झलक दिखलाजा या टीव्ही कार्यक्रमातही काम केले होते.


सय्यद किरमाणी


माजी भारतीय क्रिकेटपटू सय्यद किरमानी यांनीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. किरमाणी यांनी ‘कभी अजनबी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पाटील आणि किरमाणी यांच्यात एक अतिशय रंजक भांडणाचा सीन देखील होता, जिथे किरमाणी यांनी ॲक्रोबॅटिक्स आणि स्टंट्स करून आपली अॅथलेटिक क्षमता दाखवून आश्चर्यचकित केले.


सलीम दुराणी


भारताचा सलीम दुरानी हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू होते. काबुल, अफगाणिस्तान येथे जन्मलेले ते एकमेव भारतीय क्रिकेटपटू होते. रणजी ट्रॉफी सामन्यांदरम्यान चाहत्यांच्या विनंतीनुसार मैदानाच्या कोणत्याही भागात षटकार मारण्यासाठी दुरानी ओळखला जात असे. हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणून काम करणारे दुरानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. 1973 मध्ये बीआर इशारा यांच्या 'चरित्र' या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री परवीन बाबीसोबत डेब्यू केला होता.


सलील अंकोला


सलील अंकोला 1996 च्या विश्वचषकात भारताकडून खेळला होता. सलील अंकोला यांची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द काही खास नव्हती. सलीलने 1990 च्या दशकात भारतासाठी अनेक एकदिवसीय सामने खेळले. सचिन तेंडुलकरसोबत त्याने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीही खेळली होती. क्रिकेटमध्ये अपयशी ठरल्यानंतर अंकोलाने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. अंकोलाने एक अभिनेता म्हणून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात सोनीवरील चाहत और नफरत आणि सीआयडी सारख्या टीव्ही शोमधून केली.


सुनील गावसकर


भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. गावसकर यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. 1980 मध्ये 'सावली प्रेमाची' या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. तर, 1987 मध्ये निवृत्तीनंतर गावसकर यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या 1988 मध्ये आलेल्या 'मालामाल' चित्रपटात कॅमिओ केला होता.


विनोद कांबळी


भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीनेही चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे. कांबळीने 1993 मध्ये सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके झळकावून क्रिकेट जगताला चकित केले होते. मात्र दुर्दैवामुळे त्याची क्रिकेटमध्ये प्रगती होऊ शकली नाही. शिस्त आणि फिटनेस समस्यांमुळे 2000 मध्ये त्याची भारतीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. 1995 मध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्धच्या तांत्रिक त्रुटींमुळे त्याची कसोटी कारकीर्दही संपुष्टात आली. क्रिकेटपासून वेगळे झाल्यानंतर कांबळीने 2002 मध्ये सुनील शेट्टी स्टारर 'अनर्थ' चित्रपटात काम केले. हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला.


योगराज सिंग


योगराज सिंग अजूनही चित्रपटांमध्ये काम करतात. युवराज सिंगचे वडील योगराज यांनी भारताकडून एक कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळले. 'भाग मिल्खा भाग' या ब्लॉकबस्टर चित्रपटात योगराज सिंह यांनी मिल्खा सिंग यांच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. योगराज यांनी क्रिकेट सोडल्यानंतर पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 30 हून अधिक पंजाबी चित्रपट आणि 10 हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या