Pune Municipal Corporation Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) विविध विभागांमध्ये शिकाऊ पदांसाठी (Pune Municipal Corporation Recruitment 2022) भरती काढली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (The Urban Learning Internship Program – TULIP) अंतर्गत एका वर्षासाठी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संयुक्त विद्यमानानं ट्यूलिप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट (PMC भर्ती 2022) नवीन पदवीधरांना अनुभव देणे आणि राज्याला (PMC Internship Bharti 2022) लाभ देणं हे आहे.
PMC मध्ये जाहीर केलेल्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
लीगल इंटर्न : 2 पदं
अभियांत्रिकी इंटर्न : इलेक्ट्रिकल : 15 पदं
अभियांत्रिकी इंटर्न : सिव्हिल : 212 पदं
अभियांत्रिकी इंटर्न : पर्यावरण : 2 पदं
B.Sc : पर्यावरण : 1 पद
अभियांत्रिकी इंटर्न : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग : 2 पदं
अभियांत्रिकी इंटर्न : संगणक विज्ञान किंवा आयटी : 2 पदं
सामग्री निर्माता : 6 पोस्ट
इंटर्न हॉर्टिकल्चर : 44 पदं
इंटर्न BVSc AH : 2 पदं
इंटर्न एमएससी जीवशास्त्र किंवा प्राणीशास्त्र : 5 पदं
पदवीधर इंटर्न : B.Com : 23 पदं
पदवीधर इंटर्न : शॉर्टहँड टायपिस्ट : 4 पदं
इतर महत्वाची माहिती -
या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना पदानुसार, स्टायपेंड दिलं जाईल. दरम्यान, या पदांसाठी, उमेदवारांना 10 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिले जाईल. पीएमसी इंटर्न पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना या वेबसाइटवर जावे लागेल internship.aicteindia.org येथून तुम्ही तपशील देखील शोधू शकता.
आणखी वाचा :
Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती
India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात तब्बल 38,926 पदांची भरती; लवकर अर्ज करा, आज शेवटची तारीख
Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजच करा अर्ज
BRO Recruitment 2022 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 876 पदांसाठी मेगा भरती; शैक्षणिक पात्रतेची अट काय?