Power Crisis In Pakistan: पाकिस्तानात मोठे वीज संकट निर्माण झाले आहे. यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif ) यांनी येत्या 24 तासांत देशातील विजेचे लोडशेडिंग (Load-Shedding) कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील विविध भागात लोडशेडिंगमुळे नागरिकांसाठी (विशेषत: व्यापारी समुदाय) समस्या निर्माण होत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पंतप्रधान शरीफ यांनी शनिवारी पाच तासांच्या बैठकीत परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आणि त्यांना घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवण्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल माहिती देण्यात आली.
शाहबाज शरीफ यांनी ऊर्जा, पेट्रोलियम आणि अर्थमंत्र्यांच्या समितीला कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाहबाज शरीफ यांनी लोडशेडिंग हळूहळू कमी करण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आश्वासन देखील दिले, असे सरकारी एपीपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीला सरकारमधील मंत्री आणि उच्च-स्तरीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये तासाभराच्या लोडशेडिंगवर चर्चा केली. ज्याचा आधीच उच्च तापमानाचा सामना करावा लागत असलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. वीजटंचाई कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत भर देण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून वीज भारनियमनात स्पष्टपणे कपात करण्यात यावी, असे निर्देश शरीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याबाबत बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचा आणि दिवसा बाजार चालवण्याचे सुचवले. ते म्हणाले की, ''कराची वगळता देशातील बाजारपेठांनी योग्य व्यावसायिक तास ठरवले, तर सुमारे 3,500 मेगावॅट विजेची बचत होऊ शकते. सुमारे 7,000 मेगावॅटचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशाला कठीण निर्णय घेण्याची गरज आहे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
Bangladesh Fire in Container Depot : बांग्लादेशच्या कंटेनर डेपोला भीषण आग; 35 जणांचा मृत्यू तर 450 हून अधिक जखमी
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट? इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू