Eng vs NZ 1st Test Match: इंग्लंड आणि न्यूझीलंड (New Zealand vs England) यांच्यात लंडनमधील (London) लॉर्ड्स (Lord's) क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडनं पाच विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. रविवारी (5 जून) या सामन्याचा चौथा दिवस होता आणि सामन्याचा निकाल चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात लागला.कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी फक्त 61 धावांची गरज होती. या सामन्यात इंग्लंडचा कसोटी माजी कर्णधार जो रूटनं (Joe Root) दमदार शतक ठोकलं. या कामगिरीसह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. 


जो रूटच्या नावावर खास विक्रम
इंग्लंडसाठी सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. आता 10 हजार धावांचा आकडा गाठत त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 26 वं शतक पूर्ण केलं. इंग्लंडसाठी 10,000 हजार धावांचा आकडा पार करणारा तो दुसरा फलंदाज आहे.  रुटनं आपल्या 118व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील 14वा फलंदाज आहे.  याआधी अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता. 


कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावा
कसोटी क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. सचिननें200 कसोटी सामन्यांच्या 339 डावांमध्ये 15,921 धावा केल्या. त्याची सरासरी 53.78 आहे. सचिननंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्यानं 168 कसोटी सामन्यांच्या 287 डावांमध्ये 51.85 च्या सरासरीनं 13,378 धावा केल्या आहेत.


न्यूझीलंडविरुद्ध जो रूटच्या 1000 धावा पूर्ण
लॉर्ड कसोटी सामन्यात किवी संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 14 सामन्यातील 25 व्या डावात त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 226 आहे.


हे देखील वाचा-