IPL 2022 : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, धोका कायम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर कऱण्यात येणार आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. पण आता सुत्रांच्या माहितीनुसार, आता बायो बबल तोडणाऱ्यासाठी आणखी कठोर नियम करण्यात येणार आहे. बायो बबल तोडणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. बायो बबलचे नियम मोडणाऱ्यांना एक सामन्याची बंदी ते सात दिवसांचे क्वारंटाईन अशा शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इतकेच नाही तर, खेळाडू अथवा इतर सामना अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडूनही बायो बबल तोडल्यास गंभीर प्रतिबंध लागू शकतात.
क्रिकबजच्या एका रिपोर्ट्सनुसार, जर कोणता संघ जाणूनबुजून बाहेरील व्यक्तीला बायोबबलमध्ये येऊ देत असेल तर पहिली चूक म्हणून एक कोटी रुपयांपर्यतचा दंड होऊ शकतो. तर पुन्हा तीच चूक केल्यास संघाचा एक अथा दोन गुण कमी केले जऊ शकतात. कोरोना नियमांचं उल्लघंन करणाऱ्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येणार आहेत, असे बीबीसीयकडून सुचित कऱण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना नियमांचं उल्लघंन झाल्यानंतर गेल्यावर्षी स्पर्धा आर्ध्यातून थांबवावी लागली होती. त्यानंतर उर्वरित स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. पुन्हा तशीच चूक होऊ नये, म्हणून यावेळी कडक नियम करण्यात आले आहेत.
खेळाडूसाठी कशी असेल शिक्षा?
पहली चूक - कोरोना नियमांनुसार सात दिवसाचे क्वारटाईनमध्ये राहावे लागेल.
दूसरी चूक – सात दिवसाचे विलगीकरण त्यानंतर एका सामन्याची बंदी
तिसरी चूक – उर्वरित हंगामासाठी संघातून काढून टाकणे, त्या खेळाडूचा बदली खेळाडू मिळणार नाही
परिवारातील सदस्यांसाठीही नियमावली -
पहली चूक : सात दिवसाचे विलगीकरण
दुसरी चूक : उर्वरित हंगामासाठी संघासोबत राहाता येणार नाही. बायो बबलमधून बाहेर पाठण्यात येईल.
इतर काही नियम...
उल्लंघन : जर कोणत्या संघाकडे 12 चं खेळाडू उपलब्ध असतील अन् संघाला मैदानावर उतरण्यास असमर्थ असतील. तर अशा परिस्थितीत प्लेईंग 11 मध्ये कमीतकमी सात भारतीय खेळाडूंना खेळवू शकतात.
कोरोना चाचणी न करणारे खेळाडूही दंडास पात्र असतील. पहिल्यांदा त्या खेळाडूला इशारा दिला जाईल. पण पुन्हा तशीच चूक केली तर 75 हजार रुपयांचा दंड होईल.